TRENDING:

EPFO अकाउंटवर पैसे किती जमा होतात, इंटरनेट नसतानाही कसं करायचं चेक?

Last Updated:

EPFO ने ग्राहकांसाठी विना इंटरनेट पीएफ बॅलन्स चेक करण्याची सुविधा दिली आहे. मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे खातेदारांना माहिती मिळेल. यासाठी UAN आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

advertisement
मुंबई: कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) कोट्यवधी ग्राहकांसाठी गुडन्यूज दिली आहे. अकाउंट होल्डर्सना आता घरबसल्या विना इंटरनेट अगदी सहज अकाउंटवर किती रक्कम जमा झाली ते चेक करता येणार आहे. तुमच्या खात्यावर किती बॅलन्स आहे ते पाहण्यासाठी EPFO च्या वेबसाइटला भेट देण्याची गरज नाही. आता केवळ एक मिस्ड कॉल किंवा एक एसएमएस पाठवून माहिती घेऊ शकतात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेदारांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) त्यांच्या बँक खाते, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी किमान एका कागदपत्राशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
ईपीएफओ
ईपीएफओ
advertisement

यासोबतच, UAN सोबत नोंदणीकृत आणि सक्रिय असलेला मोबाईल नंबर असणेही अनिवार्य आहे. जर या दोन्ही गोष्टी पूर्ण असतील, तर खातेदार केवळ एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून आपल्या पीएफ बॅलन्सची माहिती मिळवू शकतात. यासाठी त्यांनी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. विशेष म्हणजे, दोन रिंगनंतर हा कॉल आपोआप कट होईल आणि त्यानंतर काही वेळातच एसएमएसद्वारे त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम त्यांना कळवली जाईल.

advertisement

ज्या खातेदारांना एसएमएसद्वारे पीएफ बॅलन्सची माहिती हवी आहे, त्यांच्यासाठीही EPFO ने सोपा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर एक विशिष्ट फॉरमॅटमध्ये मेसेज पाठवायचा आहे. मेसेजचा फॉरमॅट ‘EPFOHO UAN’ असा आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या खातेदाराचा UAN क्रमांक १२३४५६७८९१०१ असेल, तर त्यांनी ‘EPFOHO 123456789101’ असा मेसेज पाठवायचा आहे. यासोबतच, खातेदारांना त्यांच्या सोयीनुसार भाषेची निवड करण्याची संधीही मिळाली आहे.

advertisement

मराठीमध्ये माहिती मिळवण्यासाठी ‘EPFOHO UAN MAR’ असा मेसेज पाठवावा लागेल. हिंदी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम यांसारख्या अन्य भाषांमध्ये माहिती मिळवण्यासाठी संबंधित भाषेचा कोड वापरून मेसेज पाठवता येईल. मेसेज पाठवल्यानंतर काही क्षणातच खातेदारांना त्यांच्या पीएफ खात्याची सविस्तर माहिती एसएमएसद्वारे प्राप्त होईल. EPFO ची ही नवीन सुविधा विशेषतः नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, मोबाईल वापरण्यात सोयीस्कर असलेल्या नागरिकांसाठी आणि ज्यांना नेट बँकिंग किंवा EPFO पोर्टल वापरण्यास अडचणी येतात, अशा वयोवृद्ध किंवा ग्रामीण भागातील खातेदारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

advertisement

खातेदारांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ही सेवा केवळ EPFO सोबत लिंक असलेल्या UAN नंबरसाठीच उपलब्ध आहे आणि कॉल किंवा मेसेज केवळ त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरूनच पाठवणे गरजेचे आहे. ही सुविधा २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध आहे, त्यामुळे खातेदार कोणत्याही वेळी याचा लाभ घेऊ शकणार आहेत.

मराठी बातम्या/मनी/
EPFO अकाउंटवर पैसे किती जमा होतात, इंटरनेट नसतानाही कसं करायचं चेक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल