EPFO कडून देण्यात येणाऱ्या या SMS आणि मिस्ड कॉल सेवेचा लाभ घेण्यासाठी काही सोप्या अटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामध्ये तुमचा UAN क्रमांक EPFO च्या पोर्टलवर रजिस्टर्ड आणि अॅक्टिव असणे अत्यावश्यक आहे. यासोबत तुमच्या UAN अकाउंटशी आधार, पॅन किंवा बँक खाते यापैकी किमान एक डॉक्युमेंट लिंक करणं गरजेचं आहे.
ही KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सदस्य आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात. हा कॉल दोन बेलनंतर आपोआप कट होतो आणि काही क्षणांतच EPFO कडून SMS येतो, ज्यामध्ये तुमचा एकूण PF बॅलन्स आणि शेवटचा जमा झालेला हप्ता याची माहिती दिली जाते.
advertisement
SMS द्वारे माहिती हवी असल्यास, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899 या क्रमांकावर 'EPFOHO UAN MAR' असे टाईप करून पाठवा. यामध्ये 'MAR' हे मराठीसाठी वापरले जात आहे. हवे असल्यास, तुम्ही इतर भाषांमध्येही (जसे हिंदीसाठी 'HIN', इंग्रजीसाठी 'ENG') माहिती मिळवू शकता.
EPFO च्या या सुविधेमुळे लाखो कामगारांना त्यांचा PF बॅलन्स चेक करणे आता फारच सोपे झाले आहे. इंटरनेटची गरज नाही, अॅप नाही, फक्त एक कॉल किंवा एक SMS आणि बॅलन्स तुमच्या हातात!
