पीएफ खाते निष्क्रिय झाल्यावर पैसे मिळतात का?
हो, खाते निष्क्रिय झाले तरी तुमचे पैसे बुडत नाहीत. फक्त एकच फरक पडतो की, तुमच्या खात्यावर व्याज मिळणे बंद होते. याचा अर्थ तुमचे मूळ पैसे सुरक्षित राहतील, पण त्यावर व्याज वाढणे थांबेल.
निवृत्तीनंतर किती वर्षांपर्यंत व्याज मिळते?
ईपीएफओने नुकतेच स्पष्ट केले आहे की, जर एखादी व्यक्ती वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झाली, तर तिच्या पीएफ खात्यावर पुढील तीन वर्षांपर्यंत व्याज मिळत राहील. म्हणजेच, वयाच्या 61 व्या वर्षापर्यंत त्यांना व्याज मिळेल. जर तुम्ही नोकरी सोडली किंवा कंपनी बदलली आणि पैसे नवीन कंपनीच्या पीएफ खात्यात जमा केले नाहीत, तर काही वर्षांनंतर ते खाते निष्क्रिय होते आणि त्यावर व्याज मिळणे थांबते.
advertisement
पीएफचे पैसे कसे काढायचे?
ईपीएफओने पैसे काढण्याची प्रक्रिया खूप सोपी केली आहे. जर तुमचे खाते युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सोबत जोडलेले असेल आणि तुमचे केवायसी (KYC) पूर्ण असेल, तर तुम्ही सहज पैसे काढू शकता.
ऑफलाइन पद्धत
- जवळच्या ईपीएफओ कार्यालयात जा.
- फॉर्म-19, फॉर्म-10सी किंवा फॉर्म-31 भरा.
- तुमच्या ओळखपत्राची आणि बँक पासबुकची प्रत जोडा.
- गरज असल्यास कंपनीची सही आणि शिक्का घ्या.
- फॉर्म जमा केल्यावर साधारणतः 7 ते 10 दिवसांत पैसे बँक खात्यात येतात.
ऑनलाइन पद्धत
- ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन यूएएनमध्ये लॉगिन करा.
- केवायसी अपडेट करा.
- ऑनलाइन सेवांमध्ये जाऊन क्लेम (फॉर्म-31, 19, 10सी) निवडा.
- बँक खाते तपासा आणि पैसे काढण्याचे कारण (निवृत्ती, वैद्यकीय खर्च, घर खरेदी इत्यादी) निवडा.
- ओटीपी (OTP) टाकून क्लेम सबमिट करा.
- 7-8 दिवसांत पैसे तुमच्या खात्यात येतील.