नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पास फक्त राष्ट्रीय प्राधिकरण अंतर्गत असलेल्या महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर चालणार आहे. राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गांवर किंवा एक्सप्रेस वेवर चालणार नाही. महाराष्ट्रात एकूण 87 टोलनाके आहेत. मात्र त्यापैकी 18 टोल नाक्यांवर हा पास चालणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एवढा फायदेशीर होणार नाही असंही काही जणांचं म्हणणं आहे.
advertisement
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 3000 रुपयांच्या Fastag टोल पासचा तुम्हाला लाभ घेता येणार का?
तरीसुद्धा ज्यांना हा पास काढायचा आहे त्यांनी याचे काही नियम समजून घ्यायला हवेत. या 3000 रुपयांमध्ये तुम्हाला केवळ 200 ट्रिप करता येणार आहेत. त्यानंतर काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडूच शकतो. NHAI च्या माहितीनुसार, हा पास एक वर्ष किंवा 200 ट्रिपसाठी व्हॅलिड असेल. जर एखादा वाहनचालक दररोज महामार्गावरून प्रवास करत असेल आणि त्याचे 200 ट्रिप चार महिन्यांतच पूर्ण झाले, तर त्याला पुन्हा नवीन ATP घ्यावा लागेल. अशा प्रकारे, तो वर्षातून अनेक ATP खरेदी करू शकतो. ATP घेण्यावर कोणतीही मर्यादा नाही; वाहनचालकाला गरजेनुसार कितीही पास घेता येतील.
जर एखाद्या वाहनचालकाने ATP खरेदी केला, परंतु राष्ट्रीय महामार्ग किंवा एक्सप्रेसवेवर कमी प्रवास केल्यामुळे त्याचे 200 ट्रिप पूर्ण झाले नाहीत, तर ATP मध्ये शिल्लक राहिलेले पैसे परत मिळणार नाहीत, तसेच ते पुढील पाससाठी ट्रान्सफर देखील केले जाणार नाहीत. पासमध्ये राहिलेली उर्वरित रक्कम वाया जाईल. त्यामुळे, घेतलेल्या पासचा पूर्ण वापर करणेच वाहनचालकांसाठी बंधनकारक असेल. या पासची वैधता काढलेल्या तारखेपासून बरोबर एक वर्ष असेल. त्यानंतर पुन्हा नवीन पास काढावा लागेल.
FASTag: वाहनधारकांनो, लक्ष द्या! Fastag पासने वाचतील तुमचे 7000 रुपये, पण कसे गडकरींनी दिलं थेट उत्तर
महाराष्ट्रात मात्र एक्सप्रेस वे, अटल सेतू, समृद्धी महामार्गावर हा पास लागू होणार नाही. राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही टोल नाक्यांवर अथवा महामार्ग, एक्सप्रेस वेवर हा पास लागू होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी जरा हा पास काढणं अडचणीचं आहे. तसंही फास्ट टॅगसाठी मिनिमम रक्कम 200 रुपये ठेवणं बंधनकारक आहे. 3000 रुपये अडकवून जर तेवढं फिरणं वर्षभरात झालंच नाही तर तुमचे पैसे आणि पास दोन्ही वाया जाऊ शकतं.
समजा जर तुमच्या 200 ट्रिप पूर्ण झाल्या तर तुम्हाला पैसे भरावे लागतील किंवा नवीन पास घ्यावा लागेल. एका वर्षात तुम्ही किती पास घ्यावेत यावर तूर्तास तरी सरकारकडून कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. त्यामुळे तुम्ही एकपेक्षा जास्त पास घेऊ शकता.