FASTag: वाहनधारकांनो, लक्ष द्या! Fastag पासने वाचतील तुमचे 7000 रुपये, पण कसे गडकरींनी दिलं थेट उत्तर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
FASTag Pass Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 15 ऑगस्ट 2025 पासून फास्टॅगवर 3000 रुपयांचा वार्षिक टोल पास लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे वाहनचालकांना 7000 रुपयांची बचत होईल.
महामार्ग किंवा एक्सप्रेस वेवरुन प्रवास करायचा म्हणजे टोल द्यावा लागणार, टोल लागणार म्हणजे फास्टॅगला रिचार्ज सारखा करावा लागला. फास्टॅगमध्ये किमान 200 रुपये ठेवण्याचे निर्बंध आहेतच, त्यात सतत रिचार्ज करण्याची कटकट करत राहण्यापेक्षा तुम्ही एकदाच 3000 रुपयांचा पास काढू शकता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारने फास्टॅगवर नवीन स्कीम आणली आहे. ही स्कीम 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांना या स्कीममुळे मोठा फायदा होणार आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून खासगी वाहनांसाठी एक Fastag-आधारित वार्षिक टोल पास उपलब्ध होणार असून त्याची किंमत 3,000 रुपये असेल. या पासच्या माध्यमातून वाहनचालकांना वर्षभरात सुमारे 7,000 पर्यंतची बचत होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार 200 ट्रिपसाठी साधारपणे एक खासगी कार चालक 10,000 रुपये भरतो. तर त्या खासगी कार चालकाने जर हा पास काढला तर त्याचे 7000 रुपये वाचणार आहेत. 3000 रुपयांमध्ये कार चालकाला 200 ट्रिप मिळणार आहेत. हा पास नॅशनल हायवे, केंद्र सरकारच्या अख्यारित येणारे हायवे आणि एक्सप्रेसवेवर लागू होईल. राज्यस्तरीय टोल मार्ग, जसे की मुंबई-पुणे एक्सप्रेसवे किंवा समृद्धी महामार्ग यासारख्या महामार्गांवर पास लागू होणार नाही.
advertisement
Fastag पासमुळे देशभरातील टोल प्लाझांवरील वाहतूक गतीमान होईल, लांबच लांब रांगा टळतील आणि डिजिटल पेमेंटला अधिक चालना मिळेल, असंही गडकरींनी सांगितलं. केंद्र सरकारच्या या योजनेचा सर्वसामान्य मध्यमवर्गीय वाहनधारकांना मोठा फायदा होणार असून, टोल संदर्भातील अनेक जुन्या तक्रारी आणि गैरसोयी दूर होण्याची शक्यता आहे. विशेषतः जे वाहनचालक राष्ट्रीय महामार्गांवर नियमित प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
advertisement
हा नवीन पास राजमार्ग यात्रा ॲप (Rajmarg Yatra App) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्या अधिकृत वेबसाइट्सद्वारे उपलब्ध होणार आहे. सरकारकडून लवकरच यासंबंधीची अधिकृत लिंक जाहीर केली जाईल. पासचा सर्वाधिक फायदा दररोज ऑफिस किंवा व्यवसायानिमित्त राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना होईल. यामुळे त्यांच्या प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल आणि वेळेची बचत होईल. याव्यतिरिक्त, लांबच्या प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठीही हा पास एक उत्तम संधी आहे.
advertisement
या नवीन प्रणालीमुळे टोल प्लाझावर होणारी गर्दी आणि तासंतास ट्रॅफिकमध्ये उभे राहण्याची गरज संपेल. तसेच, वारंवार फास्टॅग वॉलेट रिचार्ज करण्याच्या त्रासातूनही सुटका होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे टोल संकलनात अधिक पारदर्शकता येईल आणि टोल संबंधीचे वाद मोठ्या प्रमाणात कमी होतील. फक्त 3000 रुपयांमध्ये एक वर्षाचा हा टोल पास मिळवून तुम्ही तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचवू शकाल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 19, 2025 11:21 AM IST
मराठी बातम्या/मनी/
FASTag: वाहनधारकांनो, लक्ष द्या! Fastag पासने वाचतील तुमचे 7000 रुपये, पण कसे गडकरींनी दिलं थेट उत्तर