Kalyan News: रिक्षाचालकआहे की दादा? कल्याण स्टेशन परिसरात प्रवासी रोज त्रस्त; RTO, पोलीस झोपले

Last Updated:

कल्याण पश्चिममध्ये रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा स्टँडवर रिक्षा उभी करण्यावरून सध्या दररोजच ड्रायव्हर्समध्ये आपआपसात वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे सततच्या वादविवादांमुळे प्रवासीवर्ग हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे.

News18
News18
कल्याणमध्ये रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे कल्याणमध्ये रिक्षा चालकांना रिक्षा स्टँडवर रिक्षाचा नंबर लावण्यासाठी तासंतास लाईनमध्ये उभं राहावं लागतं. रिक्षा स्टँडवर उभं राहिल्यावर काही रिक्षा चालक मधूनच स्टँडला आपली रिक्षा लावण्याचा प्रयत्न करत असतात. कल्याण पश्चिममध्ये रिक्षा चालकांमध्ये आपआपसामध्ये भांडण होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. अनधिकृत रिक्षा स्टँडवर रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून रिक्षा चालकांमध्ये वाद होताना दिसत आहे. रिक्षा उभी करण्यावरून रिक्षा स्टँडवर सध्या दररोजच ड्रायव्हर्समध्ये आपआपसात वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे सततच्या वादविवादांमुळे प्रवासीवर्ग हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे.
कल्याण पश्चिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात, अनधिकृत थांब्यावर रिक्षा चालकांमध्ये पुन्हा एकदा अरेरावी पाहायला मिळाली आहे. अनधिकृत थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षा हटवण्यावरून निर्माण झालेला वाद थेट तुफान राड्यापर्यंत पोहोचलेला आहे. रहदारीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर दोन रिक्षा चालकांमध्ये झालेल्या मारामारीमुळे काही काळ स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पोलि‍सांसमोर घडल्यानंतर भांडण करणाऱ्या रिक्षा चालकांची पोलि‍सांकडून समजूत काढण्यात आली. अनेक रिक्षा चालक अधिकृत रिक्षा थांब्याऐवजी थेट मुख्य रस्त्यावर, चौकात किंवा स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरच रिक्षा उभ्या करत असल्याचे पाहायला मिळते.
advertisement
यामुळे परिसरामध्ये रिक्षा चालकांची गर्दी, रस्त्यावर चालणाऱ्यांची गर्दी, खासगी वाहनधारकांची गर्दी आणि फेरीवाल्यांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका होण्याची मोठी गैरसोय होत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलि‍सांकडून अनधिकृतपणे उभ्या असलेल्या रिक्षा हटवण्याची कारवाई सुरू असताना काही रिक्षा चालकांनी याला तीव्र विरोध केला होता. सुरुवातीला शा‍ब्दिक वाद झाला, मात्र काही क्षणातच हा वाद हाताबाहेर गेला आणि दोन रिक्षा ड्रायव्हरमध्ये जोरदार भांडण झाले. एकमेकांना शिवीगाळ, ढकलाढकली आणि मारहाणीपर्यंत हा प्रकार पोहोचला. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना रहदारी सुरू असलेल्या मुख्य रस्त्यावर घडल्याने काही काळ पूर्णपणे वाहतूक विस्कळीत झाली होती.
advertisement
घटनास्थळी उपस्थित पोलि‍सांनी हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी दोन्हीही रिक्षा चालकांवर कारवाई करण्याऐवजी मध्यस्थी करत समज देण्याचा प्रयत्न केला. सध्या हा कल्याण स्थानकावरील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घेतली असून व्हायरल व्हिडिओमधील ड्रायव्हर्सवर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. प्रत्यक्षात दोषींवर कारवाई होते की केवळ आश्वासनांपुरतेच हे प्रकरण मर्यादित राहते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस आणि कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News: रिक्षाचालकआहे की दादा? कल्याण स्टेशन परिसरात प्रवासी रोज त्रस्त; RTO, पोलीस झोपले
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement