ठाकरे गटाला मोठा दिलासा, नॉट रिचेबल नगरसेविका अखेर संपर्कात, परबांनी सगळं सांगितलं!

Last Updated:

नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के गैरहजर राहिल्या. ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांना संपर्क करूनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही.

News18
News18
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर कोण होणार, याची चर्चा रंगली आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाने आपले नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला सकाळी एक धक्का बसला. ठाकरे गटाची एक नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाली. त्यामुळे ठाकरे गटाचा नगरसेवक फुटली अशी चर्चा रंगली. कोकण भवनात ठाकरे गटांच्या नगरसेवकांची नोंदणी झाली. पण, नॉट रिचेबल नगरसेवक रिचेबल झाले असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन ७२ जागा जिंकून दाखवत ब्रँडचा जलवा दाखवला. पण, दुसरीकडे महायुतीमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. सकाळी ठाकरे गटाच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के अचानक बेपत्ता झाल्या.  शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक गट नोंदणी पार पडली. पण  नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के गैरहजर राहिल्या. ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांना संपर्क करूनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही.
advertisement
अखेर, अनिल परब यांनी म्हस्के यांच्याशी संपर्क झाल्याचं सांगितलं आहे. "सरिता म्हस्के या आमच्या संपर्कात आहे. कोकणभवानामध्ये त्या दाखल होती. बैठकीला नसल्या तरी त्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. लवकरच कोकण भवनात येतील. राहिलेल्या नगरसेविकेचं २५ दिवसात आणखी नोंदणी होईल . त्यांनी आम्हाला सांगितलेलं कारण, आम्ही विभागीय आयुक्तांना सांगितलं आहे, पण आम्ही ते माध्यमांना सांगू शकत नाही" असं सांगत परब यांनी ठाकरे गटातून कुणीही फुटलं नसल्याचं सांगितलं.
advertisement
तसंच,  कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये जे झालं त्याबद्दल वरिष्ट बोलतील. वरिष्ठांच्या निर्णयाने सगळं होत असतं . वरिष्ठांच्या मनात काय आहे आम्हाला ठाऊक नाही' असंही ते म्हणाले.
कोण आहे सरिता म्हस्के? 
डॉ. सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक १५७ मधून शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहे.  म्हस्के यांनी भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव केला. चांदिवली परिसरातील प्रभाग क्रमांक १५७ मधून  जवळपास १८०० मतांनी डॉ. सरिता म्हस्के यांनी आशा तायडे यांना पराभूत केले. सरिता म्हस्के या पेशाने डॉक्टर असून होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. कोरोना काळात त्यांनी खूप चांगले काम केलं. आपल्या कामांनी त्या जनतेत लोकप्रिय झाल्या.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
ठाकरे गटाला मोठा दिलासा, नॉट रिचेबल नगरसेविका अखेर संपर्कात, परबांनी सगळं सांगितलं!
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement