शेअर बाजारात पैसे गुंतवले तर इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा वेगाने आणि जास्त रिटर्न मिळतात अशा आशेवर अनेक जण बाजारात पैसे गुंतवतात मात्र याचा सर्वांनाच फायदा होतो असे नाही. शेअर बाजारातील सध्याच्या घसरणीमुळे 16 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झालेल्या एका 28 वर्षीय तरुणाने बुधवारी स्वत:चा जीव घेतला.
भारतात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर? यादीत महाराष्ट्राचा क्रमांक जाणून घ्या
advertisement
नाशिकमधील चांदवड तालुक्यातील विटाई गावातील राजेंद्र कोल्हे याने शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. राजेंद्रने स्वत:च्या पगारातून पैसे गुंतवले होते. मात्र शेअर बाजारातील या घसरणीचा त्याला मोठा फटका बसला. बाजारात पैसे गुंतवण्यासाठी त्याने अनेकांकडून पैसे देखील घेतले होते.
टोल वसुलीबाबत हाय कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; संपूर्ण देशात होऊ शकतो बदल
राजेंद्र हा एका खासगी गुंतवणू्क कंपनीत काम करत होता. त्याने पैसे गावी न पाठवता शेअर बाजारात गुंतवण्यास सुरुवात केली होती. त्याची ही गुंतवणू्क काही लाखांत पोहोची होती. दरम्यान बाजार कोसळू लागला त्याचा मोठा फटका राजेंद्रला बसू लागला. त्याने नोकरी बदलून एका खासगी बँकेत काम सुरू केले.
राजेंद्रला बाजारातील घसरणीचा मोठा फटका बसला ज्यामुळे तो नैराश्यात गेला होता. बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले आणि दुपारी पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या परिसरात अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र 90 टक्क्यांहून अधिक भाजलेल्या राजेंद्रचा रात्री उशिरा मृत्यू झाला.