1. घरखर्चासाठी दिलेले पैसे - कर लागतो का?
जर नवऱ्याने आपल्या पत्नीला घरखर्चासाठी पैसे दिले, तर त्या रकमेवर कोणताही टॅक्स लागत नाही. ही रक्कम नवऱ्याच्या उत्पन्नात धरली जाते, त्यामुळे पत्नीवर त्यावर कर भरण्याची जबाबदारी नसते.
2. गुंतवणुकीसाठी पैसे दिल्यास कर कोणाला लागतो?
पत्नी जर नवऱ्याने दिलेल्या पैशाचा वापर गुंतवणुकीसाठी करत असेल, जसे की एफडी, शेअर बाजार, प्रॉपर्टी इत्यादी, आणि त्यातून उत्पन्न मिळते, तर त्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. यात विशेष बाब म्हणजे, अशी कमाई 'क्लबिंग ऑफ इनकम' या नियमानुसार नवऱ्याच्या उत्पन्नात धरली जाते. त्यामुळे करदायित्व नवऱ्यावरच येऊ शकतं.
advertisement
3. रोख रकमेच्या व्यवहारावर कायद्याचे बंधन
आयकर कायद्यातील धारा 269SS आणि 269T या कलमानुसार, रोख स्वरूपात मोठे व्यवहार टाळावेत:
कलम 269SS: 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम कोणालाही देणे बेकायदेशीर मानले जाते. अशा व्यवहारासाठी बँकिंग माध्यम (जसे की चेक, NEFT, RTGS) अनिवार्य आहे.
कलम 269T: 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत करताना सुद्धा बँकिंग माध्यमच वापरावे लागते.
विशेष बाब: नवरा-पत्नी यांच्यातील व्यवहारांमध्ये दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता कमी असली तरीही पारदर्शकता राखण्यासाठी कायद्याचे पालन आवश्यक आहे.
4. गिफ्ट दिल्यास काय?
आयकर कायद्यानुसार, नवऱ्याने पत्नीला गिफ्ट दिल्यास त्यावर कोणताही गिफ्ट टॅक्स लागत नाही, कारण नवरा-पत्नी हे ‘नजीकचे नातेवाईक’ मानले जातात. पण, गिफ्टमधून पत्नीला उत्पन्न झाल्यास त्या उत्पन्नावर मात्र कर लागतो.
5. पत्नीच्या नावावर गुंतवणूक - विशेष काळजी घ्या
जर नवऱ्याने पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी किंवा एफडी घेतली, आणि त्यातून उत्पन्न येत असेल (उदा. भाडे), तर त्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. अशा बाबतीत उत्पन्नाचा स्त्रोत स्पष्टपणे आयटीआरमध्ये दाखवणे गरजेचे आहे.
6. टॅक्स नोटीस टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम ट्रान्सफर करू नका, शक्यतो बँकिंग मार्गाने पैसे द्या – चेक, NEFT, RTGS यासारखे मार्ग वापरा. गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नाची योग्य नोंद करा. पत्नीच्या नावावर मालमत्ता घेतली असल्यास उत्पन्नावर कर भरा.
7. नियम तोडल्यास दंड किती?
धारा 269SS आणि 269T चे उल्लंघन केल्यास आयकर विभाग धारा 271D अंतर्गत उल्लंघन केलेल्या रकमेइतका दंड ठोठवू शकतो. मात्र, नवरा-पत्नी, आई-वडील आणि मुले, भाऊ-बहीण यांसारख्या नात्यांमध्ये ही कारवाई सामान्यतः केली जात नाही.
पत्नीला पैसे देताना आपण हेतू, रक्कम आणि त्या पैशाचा वापर कशासाठी होतोय. याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. घरखर्चासाठी दिलेल्या रकमेवर कर लागत नाही, पण गुंतवणूक करून उत्पन्न झाल्यास त्या उत्पन्नावर योग्य पद्धतीने कर भरणं आवश्यक आहे. अन्यथा, आयकर विभाग नोटीस पाठवू शकतो.