TRENDING:

Cryptocurrency: अखेर wazirx मधून काढता येणार पैसे, हॅकरने अख्खं ट्रेडिंग app चं केलं होतं वाटोळं!

Last Updated:

क्रिप्टो चोरीनंतर वापरकर्त्यांचे पूर्ण पैसे कव्हर करण्यासाठी वझीरएक्सकडे पुरेशी टोकन मालमत्ता नसल्यामुळे कंपनीने आंशिक पैसे काढण्याची सुविधा दिली आहे.

advertisement
मुंबई: भारतातला सर्वांत मोठा क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज असलेल्या वझीरएक्समधून वापरकर्ते आता आपले पैसे काढू शकतील. वझीरएक्सने जाहीर केलं आहे, की वापरकर्त्यांना 26 ऑगस्टपासून भारतीय रुपयांच्या स्वरूपात पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल. ग्राहकांना आपल्या एकूण फंडपैकी फक्त 66 टक्के रक्कम काढता येईल. गेल्या महिन्यात, वझीरएक्सवर मोठा सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात हॅकर्सनी सुमारे 1950 कोटी रुपयांची क्रिप्टो मालमत्ता चोरली होती. चोरीला गेलेली क्रिप्टो मालमत्ता एक्स्चेंजच्या एकूण होल्डिंगपैकी अंदाजे 45 टक्के होती. यानंतर एक्स्चेंजने फंड काढण्यावर तात्पुरती बंदी घातली होती. वझीरएक्सनं म्हटलं आहे, की आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून भारतीय चलन काढण्यासाठी आकारलं जाणारं शुल्कदेखील 60 टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. हे शुल्क आता 25 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आलं आहे.
wazirx
wazirx
advertisement

क्रिप्टो चोरीनंतर वापरकर्त्यांचे पूर्ण पैसे कव्हर करण्यासाठी वझीरएक्सकडे पुरेशी टोकन मालमत्ता नसल्यामुळे कंपनीने आंशिक पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये वझीरएक्सनं म्हटलं आहे, की वझीरएक्स प्लॅटफॉर्मवर INR-संबंधित क्रियांसाठी ऑपरेटिंग युनिट असलेलं झन्माई लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड ('Zanmai') सायबर हल्ल्यामुळे प्रभावित झालेलं नाही. सर्व INR वापरकर्त्यांची शिल्लक कव्हर करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे; पण हा सर्व फंड सध्या काढता येणार नाही.

advertisement

काही मालमत्ता फ्रीज

वझीरएक्सने म्हटलं आहे, की सध्या विविध कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था ('LEA') सायबर हल्ल्याचा तपास करत आहेत. त्यामुळे अंदाजे 34 टक्के INR शिल्लक फ्रीज करण्यात आली आहे. भारतातही वझीरएक्सच्या काही व्यवहारांची चौकशी सुरू आहे. एक्स्चेंजचं म्हणणं आहे, की ते तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहेत. सायबर हल्ल्यात झालेल्या चोरीमुळे मालमत्तेवर 1:1 कोलॅटरल राखण्यात अडचण येत आहे. अशा परिस्थितीत ट्रेडिंग तात्पुरतं थांबवावं लागलं.

advertisement

मल्टीसिग्नेचर वॉलेट झालं होतं हॅक

जुलैमध्ये वझीरएक्सचं मल्टीसिग्नेचर वॉलेट हॅक झालं होतं. त्याच्या प्रायव्हेट कीज हॅकरला मिळाल्या होत्या. मल्टीसिग्नेचर वॉलेट म्हणजे क्रिप्टो वॉलेट असतं. ते अनलॉक करण्यासाठी किंवा त्यातून पैसे काढण्यासाठी दोन किंवा अधिक प्रायव्हेट कीज गरजेच्या असतात.

सायबर हल्ल्यानंतर प्लॅटफॉर्मवरची पैसे काढण्याची सुविधा तात्पुरती थांबवण्यात आली होती. फॉरेन्सिक डेटाची तपासणी आणि सुरक्षा ऑडिट सुरू असल्याचं कारण देण्यात आलं होतं. चोरी झालेल्या क्रिप्टोचा मागोवा घेण्यासाठी आणि ते फ्रीज करण्यात मदत करणाऱ्या इथिकल हॅकर्ससाठी वझीरएक्सने मोठं बक्षीस जाहीर केलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Cryptocurrency: अखेर wazirx मधून काढता येणार पैसे, हॅकरने अख्खं ट्रेडिंग app चं केलं होतं वाटोळं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल