हिमाचल प्रदेशात पेट्रोलच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. याशिवाय राजस्थान, तेलंगना, उत्तर प्रदेशात किंमती घसरल्या आहेत. याऊलट झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २२ पैशांची वाढ झालीय. गुजरात, पंजाब, तामिळनाडु, पश्चिम बंगामध्येही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसतेय.
advertisement
चार महानगरांमध्ये पेट्रोल - डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 90.08 रुपये प्रति लीटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर
चेन्नईत पेट्रोल 102.77 रुपये तर डिझेल 94.37 रुपये प्रति लीटर
दररोज सकाळी ६ वाजता नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट इत्यादी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागते.
एसएमएसवर पाहू शकता दर
पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी ९२२४९९२२४९ या क्रमांकावर RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून पाठवावा. तर बीपीसीएल ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून ९२२३११२२२२ या क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि ९२२२२०११२२ या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.