मुंबई: पालकांकडून मुलांना शेअर्स गिफ्ट करणे ही संपत्ती हस्तांतरित करण्याची एक सामान्य आणि कायदेशीर पद्धत आहे. मात्र अशा शेअर गिफ्टिंगवर कर (Tax) कसा लागू होतो हे अनेकांना ठाऊक नसते. Moneycontrol च्या Ask Wallet Wise आज याबद्दल जाणून घेऊयात...
advertisement
वाचकाचा प्रश्न:
माझ्या वडिलांनी जानेवारी 2018 मध्ये त्यांच्या डिमॅट अकाउंटमधील सर्व शेअर्स माझ्या डिमॅट खात्यात ट्रान्सफर केले आणि त्यानंतर त्यांनी आपले अकाउंट बंद केले. ते आता शेअर बाजारात गुंतवणूक करत नाहीत. आता मी हे शेअर्स विकले तर माझ्यावर कोणता कर लागेल? आणि जर मी हे शेअर्स माझ्या प्रौढ (major) किंवा अल्पवयीन (minor) मुलीच्या नावावर ट्रान्सफर केले आणि तिने पुढे विकले तर काय होईल?
तज्ज्ञांचे उत्तर:
आयकर कायद्याच्या कलम 56(2)(x) नुसार, जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्षात मिळालेल्या गिफ्ट्सची एकूण किंमत 50,000 पेक्षा जास्त असेल, तर त्या गिफ्टवर कर भरावा लागतो. मात्र पालक, मुले, भाऊ-बहिण, पती-पत्नी यांसारख्या “नातेवाईकांकडून मिळालेली भेट” पूर्णपणे करमुक्त (Tax Exempt) असते, त्यावर कोणतीही मर्यादा (limit) लागू होत नाही.
म्हणूनच तुमच्या वडिलांनी जेव्हा तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये शेअर्स ट्रान्सफर केले. तेव्हा ते “Gift” म्हणून गणले गेले आणि त्या वेळी तुम्हाला कोणताही कर भरावा लागला नाही.
आता जर तुम्ही हे शेअर्स विकले तर?
जर तुम्ही हे शेअर्स आता विकले, तर विक्रीवर तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा कर (Long-Term Capital Gains - LTCG) भरावा लागेल. हा कर 12.5% दराने आकारला जाईल, कारण हे शेअर्स तुमच्याकडे 12 महिन्यांहून अधिक काळ राहिले आहेत.
भांडवली नफा (Capital Gains) मोजताना खालील सूत्र वापरले जाईल:
भांडवली नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
येथील खरेदी किंमत (Cost of Acquisition) म्हणजे तुमच्या वडिलांकडे असलेल्या त्या शेअर्सची किंमत (closing price) 31 जानेवारी 2018 रोजी काय होती, ती मानली जाईल. जर त्या आधी बोनस शेअर्स मिळाले असतील, तर त्यांची किंमतही यात समाविष्ट होईल.
बोनस शेअर्सबाबत:
जर तुम्हाला 31 जानेवारी 2018 नंतर बोनस शेअर्स मिळाले असतील, तर त्यांची Cost of Acquisition “शून्य (Nil)” धरली जाईल. आणि जर हे बोनस शेअर्स 12 महिन्यांहून अधिक काळ ठेवून विकले, तर त्यांनाही Long-Term Capital Gains मानले जाईल आणि त्यावर 12.5% दराने कर लागेल.
मुलाला किंवा मुलीला शेअर्स ट्रान्सफर केल्यास:
जर तुम्ही हे शेअर्स तुमच्या प्रौढ (Major) किंवा अल्पवयीन (Minor) मुलाला/मुलीला गिफ्ट म्हणून ट्रान्सफर केले, तर त्या वेळी कोणताही तात्काळ कर (Immediate Tax) लागणार नाही, कारण पालकांकडून मिळालेला गिफ्ट Tax-Free असतो.
मात्र जेव्हा तुमचा मुलगा/मुलगी पुढे हे शेअर्स विकेल तेव्हा त्यांना भांडवली नफा कर (Capital Gains Tax) भरावा लागेल — तोही अगदी याच पद्धतीने जसा वर सांगितला आहे.
पालकांकडून शेअर्स गिफ्ट स्वरूपात मिळणे करमुक्त (Tax-Free) आहे.
विक्री करताना मात्र LTCG (Long-Term Capital Gains Tax) 12.5% दराने लागू होतो.
खरेदी किंमत म्हणून 31 जानेवारी 2018 ची किंमत धरली जाते.
बोनस शेअर्सची किंमत “Nil” धरली जाते.
मुलांना शेअर्स ट्रान्सफर करताना कर लागत नाही, पण त्यांनी विक्री केल्यास LTCG लागू होतो.