MCX वर 5 मार्च वायदा करारासाठी चांदीचा दर 5.58 टक्क्यांनी, म्हणजेच प्रतिकिलो 13,378 रुपयांनी घसरून 2,26,513 रुपयांवर आला. त्याचप्रमाणे 2 एप्रिल वायदा करारासाठी सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 3,796 रुपयांनी किंवा 2.45 टक्क्यांनी कमी होऊन 1,50,964 रुपयांवर आली. मंगळवारच्या दिवशीची ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.
advertisement
विक्रमी उच्चांकापासून किती स्वस्त झाले सोने-चांदी?
29 जानेवारी रोजी सोने आणि चांदीने विक्रमी उच्चांक गाठला होता. त्या वेळी चांदीचा दर 4.20 लाख रुपये प्रतिकिलो इतका होता. सध्याच्या घसरणीनंतर चांदी तब्बल 1.93 लाख रुपयांहून अधिक स्वस्त झाली आहे.
सोन्याचा विक्रमी उच्चांक 1.93 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. त्या तुलनेत सोने आता 43 हजार रुपयांहून अधिक स्वस्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
17 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट दर प्रति औंस 4,920 ते 4,950 डॉलर्स दरम्यान व्यवहार करत होता. तर चांदीचा दर 74 ते 75 डॉलर्स प्रति औंस इतका होता. या घसरणीसह सोने आणि चांदीने या आठवड्यातील सर्वात नीचांकी स्तर गाठला आहे. तज्ज्ञांच्या मते, नफावसुली (Profit Booking) आणि डॉलरची मजबुती ही या घसरणीमागील प्रमुख कारणे आहेत.
ETF वर परिणाम होण्याची शक्यता
शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या या मोठ्या घसरणीचा परिणाम बुधवारी गोल्ड आणि सिल्व्हर ETF वरही दिसू शकतो. मंगळवारीदेखील गोल्ड-सिल्व्हर ETF मध्ये 3 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली होती.
विक्रमी उच्चांकापासून पाहिले असता सिल्व्हर ETF सुमारे 40 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, तर गोल्ड ETF जवळपास 18 टक्क्यांनी खाली आले आहेत.
रेकॉर्ड हायपासून किती स्वस्त?
29 जानेवारीला सोने-चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता.
चांदीचा रेकॉर्ड हाय: 4.20 लाख रुपये प्रति किलो
सध्याच्या भावानुसार चांदी सुमारे 1.93 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सोन्याचा रेकॉर्ड हाय: 1.93 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम
सध्याचा भाव पाहता सोने तब्बल 43 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झालं आहे.
