२ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात आणखी वाढ झाली. त्यामुळे सोनं आता त्याच्या सर्वकालिक उच्चांकाजवळ पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचे भाव ०.२२ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४,२४० डॉलर्सवर पोहोचले. त्याआधी, व्यवहारादरम्यान, सोनं हा सहा आठवड्यांचा उच्चांक ४,३५६.५० डॉलरवर पोहोचला होता. ऑक्टोबर महिन्यात सोन्याने आपला १,३२,२५० रुपयांचा उच्चांक गाठला होता. आतापर्यंतच्या विक्रमी दरापासून सोनं फक्त १.१६ टक्के दूर आहे. त्यामुळे आता सोन्याचा दर नव्याने उच्चांक गाठणार असल्याचा अंदाज एक्सपर्ट वर्तवत आहेत.
advertisement
अमेरिकेतली घडामोडीवर लक्ष...
फेडरल रिझर्व्हच्या डिसेंबरच्या बैठकीत दर कपातीची अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. फेडवॉचच्या आकडेवारीनुसार, ८७ टक्के ट्रेडर्सकडून ३५०-३७५ बेसिस पॉइंट्सच्या लक्ष्यासाठी सकारात्मक आहेत. 'रॉयटर्स'च्या एका वृत्तानुसार, फेडच्या धोरण समितीच्या १२ पैकी ५ सदस्य हे दर कपातीच्या विरोधात आहेत, तर तीन सदस्यांनी दर कमी करण्याच्या बाजूने आपला कल दर्शवला आहे.
सोन्याचा दर किती होणार?
१ डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या Augmont Bullion ने रिपोर्टमध्ये म्हटले की, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजीचे संकेत दिसून येत आहेत. सोन्याच्या दराचे पुढील टार्गेट हे ४,३४५ डॉलर प्रति औंस आणि ४,४०० डॉलर प्रति औंस आहे, ४,१७० डॉलर हा मजबूत सपोर्ट असल्याचे दिसून येत आहे. सोन्याने ४३४५ डॉलर प्रति औंस हा दर गाठल्यास भारतात सोनं हा प्रति तोळं १,४३, ३५२ रुपयांवर पोहचू शकतो. यामध्ये डॉलरचा विनिमय दर हा ८८ रुपये गृहीत धरला आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर आणखी मजबूत झाल्यास सोनं आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
LKP सिक्युरिटीजचे जतिन त्रिवेदी यांनी नोंदवले की सोन्याचे भाव सोमवारी (१ डिसेंबर रोजी) १,५०० रुपयांनी वाढून १,३१,००० रुपये झाले. जे दिवाळीपूर्वी गाठलेल्या १,३२,२५० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहोचले. त्यांच्या मते, फेडच्या दर कपातीच्या अपेक्षा आणि वाढत्या अमेरिकन कर्ज पातळीमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली आहे.
