Gold Price : सोन्याच्या दराने प्रति तोळा एक लाखाचा टप्पा गाठल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे ग्राहकांची चिंता वाढली आहे. ऐन दिवाळीच्या आधी आलेल्या एका रिपोर्टने ग्राहकांच्या चिंतेत भर टाकली आहे. सोन्याचा दर कमी होईल अशी अपेक्षा ठेवणार्यांना धक्का बसणार आहे. गोल्डमन सॅक्सच्या एका रिपोर्टने सगळ्यांची झोप उडवली आहे. जागतिक पातळीवरील राजकारण-आर्थिक घडामोडी लक्षात घेता अमेरिकेने मोठा डाव खेळल्यास सोन्याचा दर उच्चांक गाठणार आहे.
advertisement
गोल्डमन सॅक्सने एका रिपोर्टनुसार, जर जागतिक वातावरण अधिक अस्थिर झाले तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी आणि किंमत दोन्ही वाढू शकतात. सोन्याचा दर हा प्रति तोळा 1,55,000 हजारांवर पोहचू शकतो. पुढील वर्षापर्यंत हा उच्चांकी दर गाठला जाण्याची शक्यता या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेच्या खाजगी क्षेत्राकडे असलेल्या अमेरिकन तिजोरीचा फक्त 1 टक्के भाग सोन्यात गुंतवला गेला तर सोन्याची किंमत प्रति औंस 5000 डॉलर्स (सुमारे 1,55,000 रुपये प्रति 10 ग्रॅम) पर्यंत पोहोचू शकते.
रिपोर्टनुसार, या वर्षी सोने प्रमुख वस्तूंपैकी एक म्हणून उदयास आले आहे आणि किमती एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढल्या आहेत. मध्यवर्ती बँकांच्या खरेदीमुळे आणि फेडरल रिझर्व्ह लवकरच अमेरिकन व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा असल्याने ही तेजी वाढली. जर फेडरल रिझर्व्हचे निर्णय स्वातंत्र्य कमकुवत झाले तर महागाई वाढू शकते, असेही या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय...
गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्स नुसार, जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या सध्याच्या वातावरणात सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (सेंट्रल बँक) वरील दबाव, बँकेच्या स्वातंत्र्याला धोका आणि डॉलरवरील विश्वास कमी होणे अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार अमेरिकन ट्रेझरीमधून पैसे काढून सोन्यात गुंतवू शकतात.
सोन्याचे भाव का वाढतील?
रिपोर्टनुसार, जर अमेरिकेच्या ट्रेझरीमधून थोडीशी रक्कम (1 टक्के) सोन्यात गेली, तर वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. आतापर्यंत 2025 मध्ये सोने सुमारे 35 टक्क्यांनी वाढले आहे आणि अनेक केंद्रीय बँका सतत सोने खरेदी करत आहेत.
अशी वाढ कधी होऊ शकते?
गोल्डमन सॅक्सचा असा विश्वास आहे की 2026 च्या मध्यापर्यंत सोने प्रति औंस $4000 (प्रति 10 ग्रॅम 1 लाख 25 हजार रुपये) पर्यंत पोहोचू शकते, परंतु उच्च जोखीम किंवा अनिश्चिततेच्या बाबतीत, प्रति औंस $5000 (प्रति 10 ग्रॅम 1 लाख 55 हजार) देखील शक्य आहे.