TRENDING:

Gold Silver News : चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक, सोनंही महागलं! ग्राहकांच्या खिशावर भार वाढला, आजचा दर काय?

Last Updated:

Gold Silver Price : ऐन लग्नसराईच्या मोसमात सोनं-चांदीच्या दराने चांगलीच उसळण घेतल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशावरचा ताण वाढला आहे.

advertisement
Gold Silver Price Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच तेजी असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या दराने आज पुन्हा नव्याने उच्चांक गाठला आहे. ऐन लग्नसराईच्या मोसमात सोनं-चांदीच्या दराने चांगलीच उसळण घेतल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशावरचा ताण वाढला आहे.
चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक, सोनंही महागलं! ग्राहकांच्या खिशावर भार वाढला, आजचा दर काय?
चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक, सोनंही महागलं! ग्राहकांच्या खिशावर भार वाढला, आजचा दर काय?
advertisement

आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. चांदीच्या दरात ८९० रुपयांनी वाढ झाली असून १,७९, १०० रुपये प्रति किलोवर उघडली आणि जीएसटीसह १,८४,४७३ रुपये प्रति किलोवर पोहोचली. शुक्रवारी, चांदी जीएसटीशिवाय १,७८,२१० रुपये प्रति किलोवर बंद झाली आणि सोने जीएसटीशिवाय १,२८,५९२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाले. आज, २४ कॅरेट सोने १,२८,६९१ रुपयांवर उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता प्रति १० ग्रॅम १,३२, ५५१ रुपये आहे.

advertisement

आज २२ कॅरेट सोने जीएसटीसह १,२१,३६५ रुपये आणि १८ कॅरेट सोने ९९,३७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. आता, सोने १७ ऑक्टोबर रोजीच्या १,३०,८७४ रुपयांच्या सर्वोच्च पातळीपेक्षा फक्त २१८३ रुपयांनी स्वस्त आहे.

दरम्यान, ८ डिसेंबर रोजी चांदीच्या किमती १७९१०० रुपये प्रति किलो या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या.

>> कॅरेटनुसार आजचे सोन्याचे दर काय?

advertisement

आज, २३ कॅरेट सोन्याच्या दरात ९९ रुपयांनी वाढ झाली. आज २३ कॅरेट सोनं १,२८,१२२ प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता १,३१,९६५ आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

२२ कॅरेट सोन्याची किंमत ४१ रुपयांनी वाढून १,१७,८३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली. जीएसटीसह, ती १,२१,३६५ रुपये इतकी आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत ३४ रुपयांनी वाढून ९६,४७८ प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली आणि जीएसटीसह त्याची किंमत ९९,३७२ प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली.

advertisement

१४ कॅरेट सोन्याच्या किमतीतही २७ रुपयांची वाढ झाली. आज ते ७५,२५३ रुपयांवर उघडले आणि आता जीएसटीसह ७७,५१० रुपयांवर आहे.

या वर्षी सोने प्रति १० ग्रॅम ५२,९५१ रुपयांनी महाग झाले आहे. चांदी प्रति किलो ९३,०८३ रुपयांनी वाढली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे स्पॉट गोल्ड आणि चांदीच्या किमती दुपारी बारा वाजता आणि सायंकाळई ५ वाजता अशा दोन वेळेस जाहीर केल्या जातात. प्रकाशित केल्या जातात. IBJA ने दर जाहीर केलेल्या दरात तुमच्या शहरानुसार प्रति तोळा १,००० ते २,००० रुपयांचा फरक असू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold Silver News : चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक, सोनंही महागलं! ग्राहकांच्या खिशावर भार वाढला, आजचा दर काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल