सरकारकडून मध्यमवर्गाला दिलासा
सरकार मध्यमवर्गाचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. अर्थसंकल्पात कर कपात, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये कपात अशा अनेक गोष्टींमुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे. आता पीएफ व्याजदरात वाढ झाली तर त्यात आणखी भर पडेल अशी अपेक्षा आहे.
Gold Silver Price: व्हॅलेंटाइन डेआधी सोन्या चांदीचा नवा उच्चांक, 22 आणि 24 कॅरेटचे पाहा दर
advertisement
ईपीएफओच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफशी संबंधित सर्व निर्णय घेतले जातात. 28 फेब्रुवारी रोजी ईपीएफओची बैठक होणार असून, त्यात व्याजदराबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
RBI चा मोठा निर्णय, बँकांसाठी दिलासा, तुमच्यावर होणार थेट परिणाम
गेल्या दोन वर्षांतही वाढ
सरकारने गेल्या दोन वर्षातही पीएफवरील व्याजदर वाढवले आहेत. २०२२-२३ मध्ये पीएफवर ८.१५ टक्के व्याज दिले जात होते. २०२३-२४ मध्ये हा दर वाढवून ८.२५ टक्के करण्यात आला.
किती वाढ होऊ शकते?
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पीएफ व्याजदरात ०.१० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर पीएफ धारकांसाठी ही आनंदाची बातमी ठरेल.