Gold Silver Price: व्हॅलेंटाइन डेआधी सोन्या चांदीचा नवा उच्चांक, 22 आणि 24 कॅरेटचे पाहा दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईत सोन्याचे दर 88,400 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर 97,569 रुपयांवर गेले. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर अल्पावधीत घसरू शकतात.
मुंबई : सोन्या चांदीच्या दरवाढीला बुधवारी ब्रेक लागला मात्र तो एक दिवसासाठीच आज पुन्हा गुरुवारी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरांनी उसळी मारली असून पुन्हा एकदा 88 हजार 400 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीचे दर वधारले आहेत.
24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर 87, 777 रुपये प्रति तोळा आहे. तर GST सह 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर 88 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहेत. 23 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर 87 हजार 347 रुपयांवर पोहोचले आहेत. तर GST सह हेच दर 87 हजार 817 रुपयांवर गेले आहेत. सोन्या चांदीचे दर मागच्या पाच वर्षात वेगानं वाढले आहेत. तीन वर्षात सोन्याने 75 टक्के रिटर्न दिले आहेत.
advertisement
चांदीचे दर 97 हजार 569 रुपये प्रति किलोवर पोहोचलं आहे. GST सह चांदीचे दर 99500 रुपयांवर पोहोचले आहेत. 131 रुपयांनी चांदीचे दर वाढले आहेत. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे सोने 340 रुपयांनी स्वस्त होऊन 87,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मंगळवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 88,300 रुपये होता. 99.5% शुद्धतेचे सोनेही 340 रुपयांनी स्वस्त होऊन 87,560 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, जे पूर्वी 87,900 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. चांदीचे दर 600 रुपयांनी वाढून 97,200 रुपये प्रति किलो झाले.
advertisement
एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी तज्ज्ञ जतिन त्रिवेदी यांच्या मते, COMEX (आंतरराष्ट्रीय बाजार) आणि MCX (भारतीय बाजार) दोन्ही ठिकाणी सोन्याच्या किमतीत घट झाली. त्यांनी सांगितले की सोन्यावर दबाव आहे. सोन्याचे भाव अल्पावधीत घसरू शकतात. अमेरिकेत लवकरच ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) डेटा जाहीर होणार आहे. यामुळे व्याजदरांबाबत भविष्यातील शक्यता निश्चित होतील, ज्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 13, 2025 7:18 AM IST
मराठी बातम्या/Utility/
Gold Silver Price: व्हॅलेंटाइन डेआधी सोन्या चांदीचा नवा उच्चांक, 22 आणि 24 कॅरेटचे पाहा दर