RBI चा मोठा निर्णय, बँकांसाठी दिलासा, तुमच्यावर होणार थेट परिणाम

Last Updated:

RBI ने रेपो रेट 6.50 वरून 6.25 केला आहे. कोटक महिंद्रा बँकेवरील IT त्रुटींमुळे घातलेली बंदी हटवली आहे. बँक आता नवीन ग्राहक जोडू शकते आणि क्रेडिट कार्ड जारी करू शकते.

News18
News18
मुंबई: RBI नुकतंच रेपो रेटमध्ये घट केली आहे. 6.50 वरुन रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने घट केली असून 6.25 रेपो रेट केला आहे. त्यानंतर RBI ने आणखी एक दिलासा ग्राहकांना दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एप्रिल 2024 मध्ये कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली होती. बँकेच्या IT सिस्टीममध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने, RBI ने बँक नवीन ग्राहक जोडण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती.
या त्रुटींमुळे डेटा सुरक्षा आणि ग्राहक सेवेत धोका निर्माण झाला होता. मात्र, आता RBI ने बँकेला मोठा दिलासा दिला आहे. बँकेवरील बंदी हटवण्यात आली आहे. RBI ने 2022 आणि 2023 मध्ये बँकेच्या IT टेक्नॉलॉजीची तपासणी केली होती. यामध्ये IT इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच आणि चेंज मॅनेजमेंट, यूजर ॲक्सेस मॅनेजमेंट, डेटा सुरक्षा आणि डेटा लीक प्रतिबंधक रणनीतींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या.
advertisement
या IT त्रुटींमुळे बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टीम आणि डिजिटल चॅनेलमध्ये वारंवार व्यत्यय येत होते, ज्यामुळे ग्राहकांना गैरसोय झाली. 15 एप्रिल 2024 रोजी बँकेच्या सेवांमध्ये समस्या आली, ज्यामुळे ग्राहकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर बँकेवर कारवाई करण्यात आली आणि नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली. आता RBI ने बँकेवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. याचा अर्थ बँक आता नवीन क्रेडिट कार्ड जारी करू शकते आणि नवीन ग्राहकांना ऑनलाइन तसेच मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून आपल्या सेवा देऊ शकते.
advertisement
RBI चा हा निर्णय बँकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे बँकेला पुन्हा एकदा आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. तसेच, ग्राहकांनाही अधिक चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. कोटक महिंद्रा बँकेसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. RBI ने बँकेच्या IT सिस्टीममधील सुधारणा आणि ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलले होते. आता बँकेने सर्व त्रुटी दूर केल्यामुळे RBI ने बंदी हटवली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
RBI चा मोठा निर्णय, बँकांसाठी दिलासा, तुमच्यावर होणार थेट परिणाम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement