TRENDING:

Google AI Engineer: गूगलमध्ये एआय इंजिनियरचा पगार किती? या स्किल्सने मिळते टॉप कमाईची नोकरी

Last Updated:

गूगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या जगातील टॉप कंपन्या एआयमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत आहेत. यामुळे स्मार्ट सर्च इंजिन्स, व्हॉईस असिस्टंट्स, सेल्फ-ड्रायव्हिंग कार्स आणि हेल्थकेअरमध्ये स्मार्ट सोल्यूशन्स विकसित होत आहेत.

advertisement
मुंबई : एआय (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही आधुनिक युगातील सर्वात क्रांतिकारी शोधांपैकी एक मानली जाते. ही तंत्रज्ञान प्रणाली माणसांसारखं विचार करण्याची, समजण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देते. गूगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या जगातील टॉप कंपन्या एआयमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत आहेत. यामुळे स्मार्ट सर्च इंजिन्स, व्हॉईस असिस्टंट्स, सेल्फ-ड्रायव्हिंग कार्स आणि हेल्थकेअरमध्ये स्मार्ट सोल्यूशन्स विकसित होत आहेत.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

गूगलसारख्या कंपन्यांमध्ये एआय इंजिनियरची पगार श्रेणीही टॉप क्लासमध्ये येते.

टेक फील्डमधील बहुतांश विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सचं स्वप्न असतं की त्यांना गूगलमध्ये नोकरी मिळावी. इथे उत्कृष्ट पगार, ग्लोबल एक्स्पोजर आणि अत्याधुनिक प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळते. मात्र यासाठी मजबूत प्रोग्रामिंग स्किल्स, गणितातील सखोल ज्ञान, तसेच मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या क्षेत्रांमध्ये गती असणं आवश्यक आहे. योग्य दिशा, चांगले प्रोजेक्ट्स आणि मेहनतीच्या जोरावर कोणताही इंजिनियरिंग विद्यार्थी एआयमध्ये करिअर घडवू शकतो.

advertisement

आता प्रश्न असा की भारतातील AI इंजिनियरचा पगार किती असू शकतो?

गूगल इंडिया मध्ये मशीन लर्निंग इंजिनियर, अप्लाइड सायंटिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून एआय इंजिनियरचा सरासरी पगार ₹25 लाख ते ₹60 लाख प्रति वर्ष असतो. 5+ वर्षे अनुभव असणाऱ्या सीनियर रोल्समध्ये हा पगार ₹70 लाख ते ₹1.2 कोटींपर्यंत जाऊ शकतो.

advertisement

रिसर्च किंवा पीएचडी केलेल्या काही उमेदवारांना याहूनही जास्त पॅकेज मिळू शकतं.

विदेशातील एआय इंजिनियरचा पगार

अमेरिकेत गूगलमध्ये एआय/एमएल इंजिनियरचा बेस पगार $120,000 – $200,000 USD प्रतिवर्ष असतो.

बोनस आणि स्टॉक्ससह एकूण पॅकेज $200,000 – $400,000 USD पर्यंत जातं.

एआय इंजिनियर बनण्यासाठी आवश्यक पात्रता

बीटेक/बीई/एमटेक (सीएस, आयटी, इलेक्ट्रिकल, ईसीई) किंवा मशीन लर्निंग, एआय, डेटा सायन्समध्ये मास्टर्स/पीएचडी

advertisement

IITs, IIITs, IISc किंवा MIT, Stanford सारख्या टॉप संस्थांमधून शिक्षण घेतलेल्यांना अधिक संधी

प्रोग्रामिंग स्किल्स – Python (NumPy, Pandas, Scikit-Learn, TensorFlow, PyTorch), C++, Java

गणित – Linear Algebra, Probability, Statistics, Optimization

एमएल अल्गोरिदम्स – Supervised, Unsupervised Learning, Deep Learning, NLP, Computer Vision

टूल्स – TensorFlow, PyTorch, Keras, JAX, OpenAI APIs

advertisement

क्लाउड आणि बिग डेटा – Google Cloud Platform (GCP), AWS, Hadoop/Spark बेसिक्स

मजबूत DSA, समस्या सोडवण्याची क्षमता आणि चांगली कम्युनिकेशन स्किल्स

एआय इंजिनियर होण्यासाठी काय करावं?

डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम्सवर प्रभुत्व मिळवा (Competitive Programming उपयोगी)

एमएल/डीएलमध्ये 2-3 मजबूत प्रोजेक्ट्स तयार करा (NLP, Computer Vision, Recommender Systems)

ओपन सोर्समध्ये योगदान द्या

रिसर्च पेपर्स पब्लिश करण्याचा प्रयत्न करा

इंटर्नशिप करा – Google AI Residency Program किंवा Google Summer of Code मध्ये सहभागी व्हा.

मराठी बातम्या/मनी/
Google AI Engineer: गूगलमध्ये एआय इंजिनियरचा पगार किती? या स्किल्सने मिळते टॉप कमाईची नोकरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल