तसंही इतर पाण्याच्या बाटल्यांपेक्षा रेल नीर स्वस्त होतं. मात्र GST स्लॅब बदलल्यानंतर आता त्याच्या दरात आणखी कपात झाली आहे. एक लीटर पाण्याच्या बाटलीसाठी 15 तर अर्ध्या लीटरसाठी 10 रुपये मोजावे लागत होते. आता तुम्हाला या पेक्षा कमी दर मोजावे लागणार आहेत. आता रेल नीरसाठी नव्या दरांनुसार एक लीटरमागे 14 तर अर्ध्या लीटरमागे 10 ऐवजी 9 रुपये मोजावे लागणार आहेत. थंडगार पाणी अवघ्या 9 रुपयात मिळणार आहे.
advertisement
केंद्र सरकारने लागू केलेल्या GST 2.0 मुळे अनेक दैनंदिन जीवनात लागणाऱ्या बऱ्याच वस्तू स्वस्त झाल्या आहेत. याचा फायदा आता रेल्वे प्रवाशांनाही होणार आहे. जीएसटी दरातील बदलामुळे रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये मिळणाऱ्या 'रेल नीर' (Rail Neer) च्या पाण्याच्या बाटलीवर 1 रुपयाची बचत होणार आहे. रेल नीर पाण्याच्या बाटलीवर जीएसटी दर 12% वरून 5% करण्यात आल्यामुळे दर कमी झाले. त्यामुळे बाटलीच्या किमतीत थेट 1 रुपयाची बचत होणार आहे. सर्वसामान्य आणि गोरगरीबांसाठी ही बचतही खूप मोठी आहे.
तुम्हाला जर रेल्वे स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये रेल नीरच्या बाटलीसाठी निर्धारित किमतीपेक्षा जास्त पैसे मागितले, तर तुम्ही त्याविरोधात तक्रार करू शकता. तुम्ही https://railmadad.indianrailways.gov.in/madad/final/home.jsp या रेल्वेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. याशिवाय, तुम्ही 139 या हेल्पलाइन क्रमांकावरही तक्रार करू शकता.
जीएसटी 2.0 च्या अंमलबजावणीमुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. यात तांदूळ, डाळी, तूप, शॅम्पू, साबण, कपडे आणि पादत्राणे यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. 12% आणि 18% जीएसटी स्लॅबमधील अनेक वस्तू 5% च्या स्लॅबमध्ये समाविष्ट केल्यामुळे हे बदल झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांची मोठी बचत होणार आहे.