TRENDING:

GST 2.0: कार, बाईक्स, चिप्सपासून कपड्यांपर्यंत… आजपासून या गोष्टी मिळणार स्वस्त! इथे चेक करा संपूर्ण लिस्ट

Last Updated:

केंद्र सरकारच्या जीएसटी दर सुधारणा लागू, मोदींनी बचत उत्सवाची घोषणा केली. अन्न, टीव्ही, वाहन, आरोग्य उत्पादने स्वस्त, एसी हॉटेल्समधील जेवण महाग, सर्वसामान्यांना दिलासा.

advertisement
मुंबई: केंद्र सरकारनं आजपासून जीएसटी दरामध्ये सुधारणा लागू केली. त्याचा फायदा मध्यमवर्गाला सर्वात जास्त होणार आहे. खरेदी वाढणार असून अर्थव्यवस्थेला नवीन बूस्टर मिळणार आहे. जीएसटीमुळे दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्या. पॅकेज फूडसह खाद्यतेल आणि घरगुती स्वच्छता उत्पादनंही स्वस्त झाली आहेत. दर दुसरीकडे चार्जर, इअरफोन, यूएसबी केबल्स तसंच शहरातील अॅपवर आधारीत असलेल्या ऑटो आणि टॅक्सी राइड्सही स्वस्त झाले आहेत.
News18
News18
advertisement

जीएसटीमध्ये रेस्टॉरंटमधील जेवण महाग झालं, विशेषतः एसी आणि प्रीमियम हॉटेल्समधील जेवण महाग झालं आहे. तर सलून, स्पा प्रीमियम फोन, स्मार्टफोन्य आयातीच्या किंमतीही वाढणार आहे. तसंच 1200 सीसीवरील वाहनंही महाग झाली आहेत. जीएसटी कपातीनंतर टीव्ही कंपन्या 2500 ते 85000 रुपयांपर्यंत किंमत कपात करत आहेत. 32 इंचांपेक्षा मोठ्या स्क्रीन असलेल्या टीव्हींवरील करदर 28% वरून 18 टक्क्यांवर आला आहे.

advertisement

केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये मोठा बदल करत अनेक वस्तू आणि सेवांवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अन्नपदार्थ आणि खाद्यवस्तू

वनस्पती तेल: 12% वरून 5%

लोणी-तूप: 12% वरून 5%

साखर, उकडलेल्या मिठाई: 12%-18% वरून 5%

advertisement

चॉकलेट, कोको पावडर: 18% वरून 5%

पास्ता, नूडल्स, बिस्किटे: 12%-18% वरून 5%

जॅम, जेली, मुरंबा, फळांचा रस: 12% वरून 5%

मांस, मासे, फूड प्रॉडक्ट्स: 12% वरून 5%

दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त 

हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, शेविंग उत्पादने: 18% वरून 5%

टॉयलेट सोप, टूथब्रश: 18% वरून 5%

पाणी आणि दुधाचे डबे (धातू): 12% वरून 5%

advertisement

एसी, डिशवॉशर, टीव्ही: 28% वरून 18%

मेणबत्त्या, छत्र्या: 12% वरून 5%

बांबू आणि वेतापासून बनवलेले फर्निचर: 12% वरून 5%

शेती आणि आरोग्य उत्पादने

शेतकऱ्यांना आणि रुग्णांनाही मोठा फायदा होणार आहे:

ट्रॅक्टर, कृषी यंत्रसामग्री: 12% वरून 5%

बायो-कीटकनाशके: 12% वरून 5%

थर्मामीटर, डायग्नोस्टिक किट: 12%-18% वरून 5%

ग्लुकोमीटर, मेडिकल ऑक्सिजन: 12% वरून 5%

advertisement

चष्मा, औषधे आणि सर्जिकल हातमोजे: 12% वरून 5% किंवा शून्य

वाहन आणि वस्त्रोद्योग

मोटार वाहने, टायर, रोइंग बोट: 28% वरून 18%

सायकल: 12% वरून 5%

सिंथेटिक धागे, न शिवलेले कापड: 12%-18% वरून 5%

2,500 रुपयांपेक्षा कमी किमतीचे कपडे: 12% वरून 5%

2,500 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे: 12% वरून 18%

पीएम मोदी काय म्हणाले?

आजपासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलंय. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना जीएसटीच्या नव्या दरामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिलीय. देशभरात आजपासून बचत उत्सवाची सुरुवात होणार असल्याचं मोदींनी प्रतिक्रिया दिली. जीएसटीच्या नव्या दरामुळे देशातील नागरिकांची मोठी बचत होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.

देशातील लाखो लोकांना टँक्सच्या जाळ्यामुळे मोठा त्रास झाला, गरिबांवर याचा मोठा परिणाम झाला. दरम्यान देशाला यातून बाहेर काढणं गरजेचं होतं असंही मोदींनी म्हटलं आहे. आधी 18 टक्के कर लागणाऱ्या वस्तूंवर आता 5 टक्के कर लागणार आहे. जीएसटी कमी झाल्यानं अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार असल्याचं मोदींनी सांगितलंय. यामुळे घर, टीव्ही, फ्रीज, कार आणि दुचाकीसह हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च कमी होणार असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणालेत.

मराठी बातम्या/मनी/
GST 2.0: कार, बाईक्स, चिप्सपासून कपड्यांपर्यंत… आजपासून या गोष्टी मिळणार स्वस्त! इथे चेक करा संपूर्ण लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल