TRENDING:

GST new rates: काय स्वस्त आणि काय महाग होणार, तुमच्या खिशातले किती पैसे वाचणार?

Last Updated:

केंद्र सरकार जीएसटी दोन स्लॅबमध्ये आणण्याचा विचार करत आहे. खत, सौर उपकरणे, स्टेशनरी स्वस्त होतील, तर कोळसा, महागडे कपडे आणि फुटवेअर महाग होणार आहेत. GoM चर्चा झाली.

advertisement
नवी दिल्ली: केंद्र सरकार जीएसटी अधिक सोपं करण्यासाठी मोठे बदल करत आहे. सध्याचे विविध जीएसटी दर कमी करून फक्त दोन स्लॅब, म्हणजेच 5 टक्के आणि 18 टक्के, ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. 12 आणि 28 टक्क्यांचा स्लॅब काही क्षेत्रात काढून टाकण्याचा विचार आहे. तर 28 टक्के GST असलेल्या वस्तू वेगळ्या असतील. या प्रस्तावावर 'ग्रुप ऑफ मिनिस्टर्स' (GoM) च्या बैठकीत चर्चा झाली. हा प्रस्ताव मंजूर झाला तर अनेक वस्तूंच्या किमतीत मोठे बदल होतील.
News18
News18
advertisement

सध्या अनेक वस्तूंवर वेगवेगळे कर दर आहेत. सरकारला हे दर सोपे करून सर्वसामान्यांना त्याचा फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे. अंतिम निर्णय आगामी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाईल.

कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

कृषी आणि खत क्षेत्र: शेतीत वापरल्या जाणाऱ्या खतांवर (fertilizer acid) आणि जैविक कीटकनाशकांवर सध्या अनुक्रमे 18% आणि 12% जीएसटी लागतो. तो कमी करून 5% करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

advertisement

सोलार: सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर आणि इतर ऊर्जा उपकरणांवरील 12% जीएसटी कमी करून 5% केला जाईल. यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होईल.

वस्त्रोद्योग: सिंथेटिक धागे, शिवण्याचे दोरे, आणि रबर धाग्यांसारख्या वस्त्रोद्योगातील अनेक वस्तूंवरील 12% जीएसटी कमी करून 5% करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे कापडाचे उत्पादन स्वस्त होऊ शकते. कार्पेट्स आणि गॉज यांसारख्या वस्तूंवरचाही 12% जीएसटी कमी करून 5% केला जाईल.

advertisement

स्टेशनरी आणि शैक्षणिक वस्तू: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खोडरबरवरचा 5% जीएसटी पूर्णपणे काढून टाकून तो शून्य करण्याची शिफारस आहे. तसेच, नकाशे, ॲटलस, पेन्सिल शार्पनर, पेन्सिल आणि क्रेयॉन्सवरील 12% जीएसटी देखील शून्य केला जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वह्या पुस्तकांवर सध्या 12% जीएसटी पूर्णपणे काढून टाकून तो शून्य करण्याची शिफारस आहे. मॅथेमॅटिकल बॉक्स, जॉमेट्री बॉक्स आणि कलर बॉक्सवरचा 12% जीएसटी कमी करून 5% केला जाईल.

advertisement

कोणत्या वस्तू महागणार?

कोळसा आणि ऊर्जा क्षेत्र: सध्या कोळसा, ब्रिकेट्स, लिग्नाइट आणि पीटपासून बनलेल्या घन इंधनावर ५% जीएसटी आहे. तो वाढवून १८% करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ऊर्जा खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

रेडीमेड कपडे: 1000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या रेडीमेड कपड्यांवर सध्या 12% जीएसटी आहे. आता, 2500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर 18% जीएसटी लावण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे महागडे कपडे अधिक महाग होतील.

advertisement

पायांचे चप्पल आणि फुटवेअर : 2500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या फुटवेअरवर जीएसटी 12% वरून 18% करण्याची शिफारस आहे.

एकंदरीत, या बदलांमुळे सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त होतील, तर काही महागड्या वस्तू आणि इंधनावरील कर वाढू शकतो. या प्रस्तावावर अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

मराठी बातम्या/मनी/
GST new rates: काय स्वस्त आणि काय महाग होणार, तुमच्या खिशातले किती पैसे वाचणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल