उत्तर प्रदेशातील बागपत येथे एका महिलेने शेअर बाजारात मोठे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हेड कॉन्स्टेबलच्या पत्नीने 7 लाख रुपयांचे नुकसान सहन न होऊन गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली असून त्यात शेअर बाजारातील नुकसान हेच आत्महत्येचे कारण असल्याचे नमूद केले आहे.
9 शेअर्स आयुष्य बदलून टाकतील; आता पैसे गुंतवा पुढील सात पिढ्यांची चिंता मिटेल
advertisement
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव बबली असून ती दिल्लीच्या मंगोलपुरी भागातील रहिवासी होती. तिचे लग्न यूपी पोलिसांतील हेड कॉन्स्टेबल कपिल यांच्यासोबत झाले होते. सध्या कपिल हे हाथरस जिल्ह्यात कार्यरत होते. बबलीला लग्नाआधीपासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची आवड होती.
13 लाख रुपयांची गुंतवणूक, 7 लाखांचा तोटा
बबलीने एक गुंतवणूकदाराकडून 13 लाख रुपये घेतले आणि ते शेअर बाजारात गुंतवले. परंतु बाजारातील मोठ्या घसरणीमुळे तिला मोठे नुकसान झाले. तीने 6 लाख रुपये परत केले, पण उरलेले 7 लाख रुपये बुडाले. त्यामुळे गुंतवणूकदार तिला पैसे परत करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता.
EPFO खातेदारांसाठी क्रांतिकारी निर्णय; PFचे पैसे थेट ATM, UPIद्वारे काढता येणार
तणावामुळे आत्महत्या
नुकसानीमुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे आणि गुंतवणूकदाराच्या दबावामुळे बबली तणावाखाली गेली होती. शेवटी डिप्रेशनमधून तिने घरातच गळफास लावून जीवन संपवले.
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, घटनास्थळी सुसाईड नोट देखील सापडली आहे. बडौत कोतवालीचे इंस्पेक्टर मनोज कुमार चहल यांनी सांगितले की, हा आत्महत्येचा प्रकार असून सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
सरकारकडून कर्मचाऱ्यांना गिफ्ट, DA दोन टक्क्यांनी वाढवला; पाहा पगार किती होणार
शेअर बाजारातील गुंतवणूक करताना...
अनेक वेळा लोक जलद श्रीमंत होण्याच्या आशेने मोठी रक्कम गुंतवतात, पण पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन घेणे आणि जोखीम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे अधोरेखित करते.
