असा होईल परिणाम
समजा तुमचं एक घर भाड्याने दिलं आहे आणि भाड्यापोटी तुम्हाला वार्षिक 2.4 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळते आहे. सध्याच्या नियमानुसार तुमच्या भाडेकरूचा त्यावर TDS कापला जायचा. आता तो पूर्ण रक्कम तुम्हाला भाडं म्हणून देईल म्हणजे टीडीएसमुळे कमी होणारी रक्कमही तुम्हाला मिळेल. त्याचं कारण वार्षिक घरभाड्यावरच्या टीडीएसची मर्यादा सरकारने 6 लाख रुपये केली आहे. त्यामुळे भाडेकरूला कर पडणार नाही आणि तुम्हाला पूर्ण रक्कम मिळेल.
advertisement
तर भरावा लागेल टीडीएस
आता समजा, एखादा भाडेकरू ज्या घरात राहतो त्याचं वार्षिक भाडं 6 लाख रुपयांहून अधिक असेल तर त्याला टीडीएस भरावा लागेल आणि मगच घरमालकाला भाड्याची रक्कम देता येईल. म्हणजे टीडीएस भरण्याची जबाबदारी भाडेकरूची असेल. FY19 पर्यंत घरभाड्यावर टीडीएसमधील सूटीची मर्यादा 1.8 लाख रुपये होती. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जो भाडेकरू वर्षाला 6 लाख रुपयांहून अधिक भाडं घरमालकाला देतो आहे त्याचा 10 टक्के टीडीएस कापला जाईल. जर घरमालकाकडे पॅन कार्ड नसेल तर भाड्याच्या रकमेच्या 20 टक्के टीडीएस भरावा लागेल.
दिल्ली, मुंबईकरांना होणार फायदा
करतज्ज्ञांचं मत आहे की, केंद्रीय अर्थसंकल्पात टीडीएससंबंधी नियमांत केलेल्या बदलामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षांत घरभाड्याची रक्कम वेगाने वाढली आहे. त्यामुळे दरमह 20,000 रुपयांहून अधिक भाडं असेल तर भाडेकरूचा टीडीएस कापला जातो. त्यामुळे कम्प्लायन्स वाढतो. आता दरमहा 50,000 रुपयांपर्यंत भाडं भरावं लागलं तरीही टीडीएस कापला जाणार नाही. या बदलामुळे दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांत भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना खूप मोठी सवलत मिळणार आहे.
