मुंबई: इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww ची मूळ कंपनी असलेल्या बिलियनब्रेंस गॅरेज वेंचर्स लिमिटेडचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ललित केशरे आता अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. कंपनी बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर केशरे यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
advertisement
केशरे यांच्याकडे सध्या Groww चे 55.91 कोटी शेअर्स आहेत, जे कंपनीतील त्यांचा 9.06 टक्के हिस्सा आहे. शेअरची किंमत विक्रमी 178 वर पोहोचल्यानंतर केशरे यांच्या या हिश्श्याचे मूल्य 9951 कोटी झाले आहे.
मध्य प्रदेशातील लेपा गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या केशरे यांचे हे यश भारतातील स्टार्टअप इकोसिस्टममध्ये वाढत असलेल्या संधींना दर्शवते. 44 वर्षीय केशरे हे अत्यंत सामान्य परिस्थितीत वाढले. ते त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहत होते आणि मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एकमेव इंग्रजी-माध्यम शाळेत त्यांनी शिक्षण घेतले.
Groww चा शेअर 12 नोव्हेंबर रोजी 100 च्या इश्यू किमतीवर सूचीबद्ध झाला होता. केवळ चार सत्रांमध्ये तो 78 टक्के वाढला असून, कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटी च्या पुढे गेले आहे.
Growwची आयडिया
Groww ची स्थापना 2016 मध्ये ललित केशरे, हर्ष जैन, ईशान बन्सल आणि नीरज सिंग यांनी केली होती.
पहिला स्टार्टअप फेल
केशरे यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही. 2011 मध्ये त्यांनी 'Eduflix' हा पहिला स्टार्टअप सुरू केला होता. त्यावेळी इंटरनेट महाग आणि मर्यादित असल्याने ते पेन ड्राइव्ह आणि मेमरी कार्डमध्ये कोर्स मटेरियल विकत असत. मात्र हा स्टार्टअप अयशस्वी झाला आणि त्यांच्यावर कर्ज चढले. फ्लिपकार्टमध्ये नोकरी करून त्यांनी ते कर्ज फेडले.
Groww ची कल्पना
ललित केशरे यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काही शेअर्स खरेदी केले. पण शेअर्स खरेदी करण्यासाठी लागणारी कागदी औपचारिकता आणि लांब प्रक्रिया पाहून ते थक्क झाले. 'एका इंजिनिअरिंग शिकलेल्या व्यक्तीला शेअर खरेदी करताना इतकी अडचण येत असेल, तर सामान्य माणसासाठी ते किती कठीण असेल?' हा विचार त्यांच्या मनात आला. येथूनच त्यांच्या मनात गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी करण्याची कल्पना आली, जी पुढे 'Groww' च्या रूपात साकारली.
Groww ची पायाभरणी
2016 मध्ये फ्लिपकार्टमध्ये नोकरी करत असताना त्यांनी आपली कल्पना हर्ष जैन यांना सांगितली. हर्ष यांना ती कल्पना आवडली. त्यानंतर नीरज सिंग आणि ईशान बन्सल देखील टीमचा भाग झाले. या चौघांनी एकत्र येऊन 'Groww' ची सुरुवात केली. आज Groww कडे 1.19 कोटींहून अधिक सक्रिय युजर्स आहेत आणि ते भारतातील नंबर-1 ऑनलाइन ब्रोकरेज प्लॅटफॉर्म आहे.
