पण ATM कार्ड वापरण्यासोबत काही नियम आणि शुल्क देखील असतात, जे अनेकांना माहीत नसतात. हे शुल्क वार्षिक देखभाल (Annual Maintenance Charge - AMC) आणि इतर सेवांशी संबंधित असते. चला तर जाणून घेऊया ATM कार्डसंदर्भातील पाच महत्त्वाच्या गोष्टी
1. दरवर्षी ATM कार्डसाठी शुल्क आकारलं जातं
ATM कार्ड मोफत नसतं. अनेक बँका दरवर्षी देखभाल शुल्क (AMC) आकारतात. हे शुल्क कार्डच्या प्रकारानुसार बदलतं. काही साध्या कार्ड्सवर हे शुल्क शून्य असतं, तर प्रीमियम कार्डसाठी ते 2,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. यावर 18% GST वेगळा लागू होतो.
advertisement
2. मोफत व्यवहारांची मर्यादा
बहुतेक बँका महिन्यात 3 ते 5 मोफत ATM व्यवहार देतात. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 10 ते 25 रुपये शुल्क लागू होतं. त्यामुळे वारंवार पैसे काढण्यापूर्वी ही मर्यादा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
3. शुल्क का घेतलं जातं?
ATM कार्ड हे केवळ पैसे काढण्यासाठी नाही तर SMS अलर्ट्स, ऑनलाईन व्यवहार, ईमेल नोटिफिकेशन्स आणि खाते तपासणी यांसाठीही वापरलं जातं. या सर्व सुविधा चालू ठेवण्यासाठी बँका AMC आणि GST आकारतात.
4. बिनशुल्क ATM कार्डही उपलब्ध
काही बँका बेसिक डेबिट कार्ड देतात, ज्यावर कोणतेही वार्षिक शुल्क लागत नाही. मात्र अशा कार्डवर मर्यादित सुविधा असतात. बँका हे कार्ड क्वचितच प्रमोट करतात, त्यामुळे ग्राहकांनी स्वतः जाऊन चौकशी करावी लागते.
5. वापर नसलात तरी शुल्क लागू
जर ATM कार्ड घेतलं आणि वापरलं नाही, तरीही AMC आणि GST आकारले जातात. कारण हे शुल्क कार्ड अॅक्टिव्ह असतानाच लागू होतं. जर वापर करायचा नसेल, तर ते रद्द करणं किंवा बिनशुल्क बेसिक कार्ड निवडणं फायदेशीर ठरतं.
हा लेख सामान्य वापरकर्त्यांसाठी आहे, जेणेकरून ते आपलं ATM कार्ड योग्य प्रकारे वापरू शकतील आणि अनावश्यक शुल्क टाळू शकतील.
