TRENDING:

PF Interest Rate: EPFOने जाहीर केला PFवरील नवा व्याजदर, नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी बातमी

Last Updated:

EPFO Interest Rate: EPFO कडून नोकरदारांसाठी खुशखबर आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25% इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement
नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर 8.25% निश्चित केला आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये व्याजदर वाढवून 8.25% करण्यात आला होता जो पूर्वी 8.15% होता.
News18
News18
advertisement

28 फेब्रुवारी रोजी झालेल्या CBT बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. CNBC TV18ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने (CBT) हा निर्णय घेतला आहे.

शेअर बाजारातील घसरणीचा पहिला बळी; नाशिकच्या तरुणाने स्वत:चा जीव घेतला

गेल्या काही वर्षांमध्ये EPFO ने व्याजदरांमध्ये चढ-उतार केले आहेत. मार्च 2022 मध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर 8.5% वरून 8.1% करण्यात आला होता, जो 1977-78 नंतरचा सर्वात कमी व्याजदर होता. मार्च 2020 मध्ये 2019-20 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर सात वर्षांच्या नीचांकी स्तरावर म्हणजे 8.5% करण्यात आला होता, तर 2018-19 मध्ये हा दर 8.65% होता.

advertisement

EPFO च्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो नोकरदारांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या निवृत्ती निधीवर स्थिर आणि आकर्षक परतावा मिळेल.

मराठी बातम्या/मनी/
PF Interest Rate: EPFOने जाहीर केला PFवरील नवा व्याजदर, नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी बातमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल