Stock Market: शेअर बाजारातील घसरणीचा पहिला बळी; नाशिकच्या तरुणाने पेट्रोल टाकून पेटवून स्वत:चा जीव घेतला

Last Updated:

Stock Market Crash: शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळे नैराश्य आलेल्या 28 वर्षीय तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. 90 टक्के भाजलेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

News18
News18
नाशिक: भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यांपासून घसरणीचा ट्रेंड आहे. गेल्या काही दिवसात मोठ्यासह छोट्या गुंतवणुकदारांनी आपल्या मेहनतीचे पैसे गमावले आहेत. बाजारातील या घसरणीच्या ट्रेंडवर अनेक जण गुंतवणुकदारांना पैसे गुंतवताना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टत अनुक्रमे 13.23% आणि 14.19% इतकी घसरण झाली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स 40 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. याचा सर्वाधिक फटका लहान गुंतवणूकदारांना बसला आहे.
शेअर बाजारात पैसे गुंतवले तर इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा वेगाने आणि जास्त रिटर्न मिळतात अशा आशेवर अनेक जण बाजारात पैसे गुंतवतात मात्र याचा सर्वांनाच फायदा होतो असे नाही. शेअर बाजारातील सध्याच्या घसरणीमुळे 16 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झालेल्या एका 28 वर्षीय तरुणाने बुधवारी स्वत:चा जीव घेतला.
भारतात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर? यादीत महाराष्ट्राचा क्रमांक जाणून घ्या
नाशिकमधील चांदवड तालुक्यातील विटाई गावातील राजेंद्र कोल्हे याने शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. राजेंद्रने स्वत:च्या पगारातून पैसे गुंतवले होते. मात्र शेअर बाजारातील या घसरणीचा त्याला मोठा फटका बसला. बाजारात पैसे गुंतवण्यासाठी त्याने अनेकांकडून पैसे देखील घेतले होते.
advertisement
टोल वसुलीबाबत हाय कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; संपूर्ण देशात होऊ शकतो बदल
राजेंद्र हा एका खासगी गुंतवणू्क कंपनीत काम करत होता. त्याने पैसे गावी न पाठवता शेअर बाजारात गुंतवण्यास सुरुवात केली होती. त्याची ही गुंतवणू्क काही लाखांत पोहोची होती. दरम्यान बाजार कोसळू लागला त्याचा मोठा फटका राजेंद्रला बसू लागला. त्याने नोकरी बदलून एका खासगी बँकेत काम सुरू केले.
advertisement
राजेंद्रला बाजारातील घसरणीचा मोठा फटका बसला ज्यामुळे तो नैराश्यात गेला होता. बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले आणि दुपारी पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या परिसरात अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र 90 टक्क्यांहून अधिक भाजलेल्या राजेंद्रचा रात्री उशिरा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Stock Market: शेअर बाजारातील घसरणीचा पहिला बळी; नाशिकच्या तरुणाने पेट्रोल टाकून पेटवून स्वत:चा जीव घेतला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement