लहान गुंतवणूकदारांमध्ये एसआयपी अधिक लोकप्रिय होत आहे. याचे कारण म्हणजे कमी पैशांची गुंतवणूक केल्यानंतर बंपर रिटर्न मिळू शकतात. त्यामुळे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. चला तर, जर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा दोन हजार, तीन हजार किंवा पाच हजार रुपये गुंतवले तर किती वर्षात तुमच्याकडे एक कोटी रुपये जमा होतील? हे जाणून घेऊ.
advertisement
महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणूक
जर तुम्ही एसआयपीमध्ये महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणूक केल्यास तुमची 22 वर्षांत एकूण गुंतवणूक 13,20,000 रुपये होईल. या गुंतवणुकीवर तुम्हाला 15 टक्के दराने 90,33,295 रुपये रिटर्न मिळतील. याचाच अर्थ तुम्हाला 22 वर्षानंतर अंदाजे एकूण रक्कम 1,03,53,295 रुपये मिळतील.
महिन्याला तीन हजार रुपये गुंतवणूक
एसआयपी योजनेत महिन्याला तीन हजार रुपये गुंतवणूक केल्यास तुमची 26 वर्षात एकूण गुंतवणूक 9,36,000 रुपये होईल. या रक्कमेवर तुम्हाला 15 टक्के दराने 1,05,39,074 रुपये रिटर्न मिळती. याचाच अर्थ तुम्हाला 26 वर्षानंतर अंदाजे एकूण रक्कम 1,14,75,074 रुपये मिळतील.
महिन्याला दोन हजार रुपये गुंतवणूक
जर तुम्ही एसआयपीमध्ये महिन्याला दोन हजार रुपये गुंतवणूक केल्यास तुमची 28 वर्षात एकूण गुंतवणूक 6,72,000 रुपये होईल. या गुंतवणुकीवर तुम्हाला 15 टक्के दराने 96,91,573 रुपये रिटर्न मिळतील. याचाच अर्थ तुम्हाला 28 वर्षानंतर अंदाजे एकूण रक्कम 1,03,63,573 रुपये मिळतील.
दरम्यान, एसआयपी योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही योग्य नियोजन केल्यास कमी कालावधीत तुम्ही करोडपती होऊ शकता. या योजनेत गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामुळेच ही योजना दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.