TRENDING:

वंदे भारत स्लीपर कधी धावणार, मोदी सरकारकडून नव वर्षाचे मोठ गिफ्ट; रुट ते तिकीटाचे दर, सर्व काही जाणून घ्या

Last Updated:

Vande Bharat Sleeper Train: भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. ही ट्रेन पुढील काही दिवसांत सेवेत दाखल होईल. 180 किमी प्रतितास वेग आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही ट्रेन प्रवाशांना रात्रीचा आरामदायी प्रवास देणार आहे.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत मोठी घोषणा केली. ही ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता या मार्गावर धावणार आहे. ही ट्रेन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. तसेच पुढील 17 ते 18 दिवसांत ही ट्रेन सेवेत दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

रेल्वेमंत्र्यांनी ट्रेनच्या वैशिष्ट्यांची माहिती देताना सांगितले की, या ट्रेनचा डिझाइन वेग 180 किमी प्रतितास आहे. ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील. यामध्ये 11 थ्री-टियर (3AC), 4 टू-टियर (2AC) आणि 1 फर्स्ट एसी (1AC) डबा असेल. ही ट्रेन कवच सुरक्षा प्रणाली आणि इमर्जन्सी टॉक-बॅक सिस्टीमने सुसज्ज असेल.

advertisement

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्लीपर वंदे भारत ट्रेन

वंदे भारत ट्रेनची स्लीपर आवृत्ती याच महिन्यात आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांदरम्यान सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार असून, मार्च-एप्रिल दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे.

advertisement

रेल्वेमंत्र्यांनी आश्वासन दिले की, ट्रेनसंदर्भातील सर्व अधिकृत तपशील आठवड्याच्या अखेरीस जाहीर केले जातील. या मार्गावर दोन गाड्या सुरू केल्या जातील आणि त्या दोन्ही बाजूंनी धावतील. हा प्रवास रात्रीचा (ओव्हरनाईट) असेल. रात्री जेवण आणि सकाळी चहा प्रवाशांना दिला जाईल.

प्रवाशांसाठी स्थानिक खाद्यपदार्थ

advertisement

ही वंदे भारत स्लीपर ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून भारतातच डिझाइन आणि निर्मित करण्यात आली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की,  गुवाहाटीहून सुरू होणाऱ्या ट्रेनमध्ये आसामी जेवण दिले जाईल. तर कोलकाताहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये बंगाली जेवण प्रवाशांना दिले जाईल.

A: वंदे भारत स्लीपर ट्रेन: डब्यांची रचना आणि आसन क्षमता

Q: या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील, ज्यात... 

11 थ्री-एसी (3AC) डबे 611 प्रवासी क्षमता

4 टू-एसी (2AC) डबे 188 प्रवासी क्षमता

1 फर्स्ट एसी (1AC) डबा 24 प्रवासी क्षमता

या सर्व डब्यांची एकूण प्रवासी क्षमता 823 इतकी असेल.

A: वंदे भारत स्लीपर ट्रेन तिकीट दर किती असणार?

Q: या ट्रेनचे अंदाजे तिकीट दर पुढीलप्रमाणे असतील

थ्री-टियर (3AC) : सुमारे 2,300

टू-टियर (2AC) : सुमारे 3,000

फर्स्ट एसी (1AC) : सुमारे 3,600

A: वंदे भारत ट्रेन प्रति किलोमीटर भाडे 

Q: 3AC साठी 2.40 प्रति किमी

2AC साठी 3.10 प्रति किमी

1AC साठी 3.80 प्रति किमी असेल.

200 स्लीपर वंदे भारत ट्रेन

रेल्वे मंत्रालयाचे उद्दिष्ट पुढील सहा महिन्यांत आणखी 8 वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचे आहे. तर वर्षअखेरपर्यंत 12 अतिरिक्त ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. एकूणच, भविष्यात 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

वंदे भारत स्लीपर ही तिसरी श्रेणी असून, याआधी चेअर कार आणि वंदे मेट्रो या श्रेणी सुरू करण्यात आल्या आहेत. या सेमी-हाय-स्पीड ट्रेनचा डिझाइन वेग 180 किमी प्रतितास असून, ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस दोन्ही बाजूंनी धावणार आहे.

यशस्वी हाय-स्पीड चाचणी पूर्ण

भारतीय रेल्वेने रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS) यांच्या देखरेखीखाली वंदे भारत स्लीपर ट्रेनची अंतिम हाय-स्पीड चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही चाचणी कोटानागदा सेक्शनवर घेण्यात आली. या दरम्यान ट्रेनने 180 किमी प्रतितास वेग गाठला, जो भारताच्या प्रगत रेल्वे तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

आधुनिक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था

या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी आरामदायी स्लीपर बर्थ, प्रगत सस्पेन्शन सिस्टीम, स्वयंचलित दरवाजे, आधुनिक शौचालये, अग्निशमन व सुरक्षा निरीक्षण प्रणाली, सीसीटीव्हीवर आधारित देखरेख, डिजिटल प्रवासी माहिती प्रणाली आणि ऊर्जा-बचत तंत्रज्ञान अशा अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

या सर्व सुविधा प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या काही महिन्यांआधी ही ट्रेन सुरू होत असून, पूर्व भारतातील रेल्वे कनेक्टिव्हिटी हा एक महत्त्वाचा विकासाचा मुद्दा ठरत आहे.

मराठी बातम्या/मनी/
वंदे भारत स्लीपर कधी धावणार, मोदी सरकारकडून नव वर्षाचे मोठ गिफ्ट; रुट ते तिकीटाचे दर, सर्व काही जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल