मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲण्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ कार्यक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी भाषण केलं होतं.
"एआय आता मनोरंजनासाठी ते करत आहे जे १०० वर्षांपूर्वी सायलेंट कॅमेरा करत होता आणि तेही लाखो पटीने चांगलं. जगातील १.४ अब्ज लोकसंख्या असलेला हा देश गेल्या ५ हजार वर्षांपासून गोष्टी सांगत आणि ऐकत आहे. कंटेंट आणि लोकसंख्येनंतर, भारताची तिसरी सर्वात मोठी ताकद तंत्रज्ञान आहे. भारतातील १.२ अब्ज मोबाईल फोन वापरकर्ते म्हणजे १.२ अब्ज स्क्रीन, ज्या मनोरंजनासाठी वापरता येतात. जिओने हाय-स्पीड इंटरनेट डेटा परवडणारा बनवून भारताच्या डिजिटल आणि मनोरंजन क्रांतीत आघाडीचे योगदान दिले आहे. ५ जी वर बांधलेली आमची जागतिक दर्जाची डिजिटल पायाभूत सुविधा लवकरच ६ जी पर्यंत वाढवली जाईल." असं यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.
advertisement
"जागतिक मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांना स्पर्धा करून त्यांना मागे टाकण्याच्या महत्त्वाकांक्षेने आम्ही JioHot लाँच केलं आहे. हे भारत आणि परदेशातील सर्वोत्तम प्रतिभांना एक व्यासपीठ प्रदान करेल. आम्ही सर्वाधिक पाहण्याचे रेकॉर्ड तोडले आहेत, आयपी स्ट्रीमिंगमध्ये क्रांती घडवली आहे आणि इमर्सिव्ह, बहुभाषिक, क्रीडा सामने दाखवण्यात जागतिक मानक बदलले आहेत. आणि ही फक्त सुरुवात आहे. डिस्नेसोबत जिओची भागीदारी डिजिटल स्टोरीटेलिंगमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे." असंही यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.