TRENDING:

Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय! 1 ऑक्टोबरपासून बदलली तिकीट बुकिंगची पद्धत, लगेच जाणून घ्या

Last Updated:

1 ऑक्टोबर 2025 पासून IRCTC वेबसाइट आणि ऍपवर तिकिट बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या 15 मिनिटांत फक्त आधार पडताळणी (Aadhaar Authentication) केलेले यूजर्सच तिकिट घेऊ शकतील.

advertisement
मुंबई : भारतामध्ये रेल्वे प्रवास हा कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. मात्र, जेव्हा तिकिट आरक्षणाची वेळ सुरू होते तेव्हा पहिल्याच काही मिनिटांत सर्व तिकिटं बुक होऊन जातात. यामुळे सामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, तर दुसरीकडे एजंट आणि दलाल या प्रणालीचा गैरवापर करतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

याच समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं आता एक महत्त्वपूर्ण आणि कडक निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून IRCTC वेबसाइट आणि ऍपवर तिकिट बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या 15 मिनिटांत फक्त आधार पडताळणी (Aadhaar Authentication) केलेले यूजर्सच तिकिट घेऊ शकतील.

रेल्वेचं नवं नियम काय सांगतो?

आरक्षण सुरू झाल्यानंतरचे पहिले 15 मिनिटे फक्त आधार व्हेरिफाइड यूजर्ससाठी. अधिकृत एजंटसाठी आधीपासून असलेला नियम लागू राहील म्हणजे पहिल्या 10 मिनिटांत ते तिकिट बुक करू शकणार नाहीत. PRS काउंटर (स्टेशनवरील आरक्षण खिडकी) वर मात्र कोणताही बदल होणार नाही.

advertisement

आधार पडताळणी का गरजेची?

तिकिट उघडल्यानंतर सुरुवातीच्या मिनिटांत मोठ्या प्रमाणावर एजंट खोट्या आयडी वापरून तिकिटं ब्लॉक करतात. यामुळे सामान्य प्रवाशांना तिकिट मिळत नाही. आधार ऑथेंटिकेशनमुळे एका खऱ्या ओळखीतूनच तिकिट बुक होईल, ज्यामुळे ब्लॅक मार्केटिंगवर मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.

प्रवाशांना काय फायदा होईल?

सामान्य प्रवाशांना सहज तिकिट मिळेल. तिकिटिंग सिस्टम अधिक पारदर्शक बनेल. ब्लॅकिंग आणि दलालीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण येईल. IRCTC अकाऊंट अधिक सुरक्षित होईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सीट मिळण्याची संधी वाढेल.

advertisement

काही प्रवाशांनी हा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे, कारण यातून सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. तर काही जणांचं म्हणणं आहे की ज्यांचं आधार लिंक झालेलं नाही किंवा मोबाईल नंबर जोडलेला नाही, त्यांना अडचण येऊ शकते.

रेल्वेचं हे पाऊल सामान्य प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारं आहे. पहिल्या 15 मिनिटांत आधार आधारित बुकिंग झाल्यामुळे खरे प्रवासीच तिकिट घेतील, दलाल आणि एजंटांचा प्रभाव कमी होईल आणि रेल्वे तिकिटिंग प्रणाली आणखी पारदर्शक बनेल.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय! 1 ऑक्टोबरपासून बदलली तिकीट बुकिंगची पद्धत, लगेच जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल