तुम्ही MISच्या संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करू शकता
पोस्ट ऑफिस त्यांच्या ग्राहकांना मासिक उत्पन्न योजनेवर वार्षिक 7.4 टक्के व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत किमान 1000 रुपये जमा करता येतात. या योजनेअंतर्गत, एकाच खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर तुम्ही त्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करू शकता. एका जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 3 लोक समाविष्ट केले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये SIS खाते उघडण्यासाठी, तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचेच सेव्हिंग्स अकाउंट असणे आवश्यक आहे.
advertisement
5000 रुपयांनी सुरु करा हा बिझनेस! दरमहा होऊ शकते 50 हजारांची कमाई
तुम्ही 9 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा 5550 रुपयांचे निश्चित व्याज मिळेल
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेत 9 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 5550 रुपयांचे निश्चित व्याज मिळेल. MIS योजनेअंतर्गत, दरमहा मिळणारे व्याजाचे पैसे थेट तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा होत राहतात. पोस्ट ऑफिसची ही योजना 5 वर्षांत परिपक्व होते. मुदतपूर्तीनंतर, तुम्ही जमा केलेले सर्व पैसे तुमच्या बचत खात्यात परत ट्रान्सफर केले जातात.
फ्रीमध्ये मिळू शकतं फ्लाइट तिकीट! जाणून घ्या एअर माइल्सचं पूर्ण गणित
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिला आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा आर्थिक जोखीम घेण्यापूर्वी, तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. न्यूज 18 कोणत्याही प्रकारच्या जोखमीसाठी जबाबदार राहणार नाही.