TRENDING:

IRCTC ने आणलंय खास पॅकेज, स्वस्तात करता येईल कूर्ग, म्हैसूर आणि उटीची सैर!

Last Updated:

IRCTC Tour Package: हे टूर पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी आहे. 'देखो अपना देश' अंतर्गत हे टूर पॅकेज सुरू करण्यात आलेय. ज्वेल्स ऑफ साउथ इंडिया असे या टूर पॅकेजचे नाव आहे.

advertisement
IRCTC Tour Package: IRCTC ने पर्यटकांसाठी एक शानदार टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटक कुर्ग, म्हैसूर, उटी आणि बंगलोरला स्वस्तात भेट देऊ शकतात. विशेष म्हणजे, IRCTC पर्यटकांसाठी विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते. या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवासी स्वस्तात आणि सोयीनुसार प्रवास करतात आणि पर्यटनालाही चालना मिळते. या टूर पॅकेजविषयी सविस्तर जाणून घेऊया.
आयआरसीटीसी टूर पॅकेज
आयआरसीटीसी टूर पॅकेज
advertisement

हे टूर पॅकेज 7 दिवसांचे आहे

IRCTC चे हे टूर पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांचे आहे. 'देखो अपना देश' अंतर्गत हे टूर पॅकेज सुरू करण्यात आले आहे. ज्वेल्स ऑफ साउथ इंडिया असे या टूर पॅकेजचे नाव आहे. या टूर पॅकेजची सुरुवात दिल्लीपासून होणार आहे.

टूर पॅकेज कधी सुरू होणार?

advertisement

IRCTC चे हे टूर पॅकेज 28 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हे टूर पॅकेज 25 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होईल. या टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत रु.40,380 आहे. आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजचे बुकिंग टुरिस्ट रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून करता येते. याशिवाय पर्यटक 8287930202 आणि 8287930718 या क्रमांकावर कॉल करून बुकिंग करू शकतात. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक एअर मोडने प्रवास करतील. टूर पॅकेजसाठी ग्रुप साइज 30 आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना ब्रेकफास्ट आणि डिनर मोफत मिळणार असून पर्यटकांसाठी राहण्याची सोयही मोफत असणार आहे.

advertisement

IRCTC च्या या टूर पॅकेजचे भाडे

IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 53180 रुपये भाडे द्यावे लागतील. दुसरीकडे, तुम्ही या टूर पॅकेजमध्ये दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 41710 रुपये भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही तीन लोकांसह टूर पॅकेजमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला 36470 रुपये भाडे द्यावे लागेल. तुम्ही या टूर पॅकेजमध्ये 5 ते 11 वर्षांच्या मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 35090 रुपये भाडे द्यावे लागेल आणि 2 ते 4 वर्षांच्या मुलांसोबत टूर पॅकेजमध्ये प्रवास केल्यास तुम्हाला 26860 रुपये भाडे द्यावे लागेल.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
IRCTC ने आणलंय खास पॅकेज, स्वस्तात करता येईल कूर्ग, म्हैसूर आणि उटीची सैर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल