आयटीआर भरण्यासाठी अंतिम मुदत जाहीर केली आहे. या तारखेनंतर आयटीआर भरता येत नाही. थेट दंडाची रक्कम भरावी लागते. 31 जुलैपर्यंत आयटीआर भरण्याची तारीख होती. मात्र ती वाढवण्यात आली आहे. आता 15 सप्टेंबरपर्यंत ITR फाइल करता येणार आहेत. जर तुम्ही 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही आयटीआर भरला नाही तर 31 डिसेंबरपर्यंत दंड भरुन तुम्ही तो फाइल करु शकता. जर एखादी व्यक्ती काही विशिष्ट परिस्थितींमुळे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल करू शकत नसेल, तर तो 'अपडेटेड रिटर्न' देखील भरू शकतो यासाठी काही विशेष अटींचं पालन देखील करावं लागतं.
advertisement
15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. तुमच्या उत्पन्नातून टॅक्सची रक्कम कापून घेतली जाईल. 31 मार्च 2025 पर्यंत संपूर्ण आगाऊ कर भरला नाही तर थकीत कर रकमेवर व्याजही भरावं लागेल. 5 लाखाच्या उत्पन्नावर 5000 रुपये दंड आकारला जाईल. 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नावर 1000 रुपये दंड आकारला जाईल. 15 सप्टेंबरनंतर तुम्हाला आयटीआर दाखल करता येणार नाही. त्यामुळे वेळेवर आयटीआर फाइल करणं जास्त गरजेचं आहे.
आयटीआर भरण्यासाठी तुम्ही Income Tax साइटवर लॉगइन करुन स्वत: भरु शकता. त्यासाठी तुम्हाला PAN नंबर, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. तुम्ही स्वत: रजिस्टर करुन ITR भरू शकता. CA ची मदत घेऊन देखील तुम्ही भरू शकता. मात्र तुमच्याकडे आता 32 दिवसच शिल्लक राहिले आहेत.