करमाड येथे उमेद अंतर्गत रमाई स्वयंसहायता बचत गटाद्वारे केल्या जाणाऱ्या पापड व्यवसायात आणि बचत गटाशी संबंधित असलेल्या एकूण साठ महिलांचा सहभाग आहे. पापड हे स्वतः कल्पना गायकवाड इतर महिलांची मदत घेऊन घरगुती पद्धतीने बनवत असतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी देखील होणारे विविध प्रकारचे प्रदर्शन त्यामध्ये पापड विक्रीचा स्टॉल लावलेला असतो. पापडांच्या प्रकारामध्ये पाहिलं तर उडीद पापड, लसूण पापड, उपवासाचे पापड असे अनेक प्रकार पापडांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात.
advertisement
शेतात फवारणीची वेळ चुकवताय? थेट उत्पादनावर बसेल फटका, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
पापड निर्मितीत यंत्राचा वापर
ज्याप्रमाणे ऑर्डर येतील किंवा स्टॉलवर विकण्यासाठी विविध प्रकारचे पापड तयार करावे लागतात. त्यावेळी पापड बनवण्याचा यंत्राचा देखील वापर केला जातो त्यामुळे पापड बनवण्याचे काम कमी वेळात पूर्ण होते. त्यामुळे बाहेर देखील विक्री वेळोवेळी होते. त्यामुळे व्यवसाय वाढीस मदत होत आहे. तसेच यंत्रसामग्रीमुळे काम करण्यासाठी महिला कमी लागतात.
बचत गटाअंतर्गत व्यवसाय कसा करावा?
इतर महिलांना गृह उद्योग करायचा झाल्यास त्यांना सर्वप्रथम बचत गटामध्ये सहभाग घेणे आवश्यक असते. त्या बचत गटाअंतर्गत व्यवसायासाठी नाव नोंदणी करावी लागते. त्यानंतर आपण निवडलेल्या क्षेत्रातील प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. त्यानंतर व्यवसाय सुरू करण्यास काही हरकत नाही तसेच नवीन तरुणी आणि महिलांनी देखील या व्यवसायात उतरायला पाहिजे. त्यामुळे त्या महिला स्वावलंबी होतील, असे देखील गायकवाड यांनी म्हटले आहे.