या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला अवघ्या 436 रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा टर्म इंश्योरंस मिळतो. या योजनेची सुरुवात ही 2015 मध्ये झाली. या योजनेचा हफ्ता माफक असल्यामुळे तसेच मिळणारे फायदे तुलनेनं जास्त असल्यामुळे ही योजना लोकप्रिय ठरली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये अनेक लोकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.
नियम व अटी
advertisement
प्रधानमंत्री जीवन विमा या योजनेचा लाभ हा भारतातील कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. फक्त त्याच वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त व 50 वर्षांपेक्षा कमी असावे. या पॉलिसीचा लाभ 55 वर्षांपर्यंत घेता येतो. प्रधानमंत्री जीवन योजनेचा लाभ घेऊ इच्छिनाऱ्या व्यक्तीला दरवर्षी 436 रुपये भरावे लागतात. दरवर्षी एकाच हफ्त्यामध्ये हा पैशांचा भरणा करावा लागतो. तुम्ही विम्याचा हफ्ता भरला की तुम्हाला 1 जून पासून पुढच्या 31 मेपर्यंत जीवन विमा मिळतो. मात्र जर पुढच्यावेळेस तुम्ही हफ्ता भरला नाही तर तुमची पॉलिसी रद्द केली जाते. या विम्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बॅंकेचं पासबुक आणि मोबाईल नंबर या गोष्टी असणं अवश्यक आहे.