आई - बाबा शेतमजूर पण...
तसं म्हणायला गेलं तर कोल्हापूर हे झणझणीत मटन, तांबडा पांढरा रस्सा आणि मिसळीसाठी प्रसिद्ध आहे. त्यातही अगदी लवकरात लवकर होणारा पदार्थ म्हणजे मिसळ. यामध्ये आकाश आणि शिवम यांना एकत्र येऊन कोणतातरी व्यवसाय सुरू करायचा होता. या दोघांची अत्यंत घनिष्ठ मैत्री. बारावी झाल्यानंतर कोणता तरी व्यवसाय सुरू करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यापैकी शिवमला व्यवसायाचा अनुभव होता मात्र आकाशाच्या घरची परिस्थिती थोडी बेताचीच होती. त्याचे आई-बाबा शेतमजूर म्हणून काम करत होते.
advertisement
शिक्षणासोबत तरुणाची शेती, केली गुलाब लागवड, वर्षाला 6 लाख रुपयांचा नफा
त्यामुळे व्यवसाय करण्याचे धाडस त्याच्यात होत नव्हतं. पण कसंबसं धाडस करून पाठबळाने शेवटी आकाशने धाडस केलं आणि त्यानुसार त्यांनी मिसळ सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा ठरला. यासाठी त्यांनी अगोदर वेगवेगळ्या पद्धतीच्या मिसळीचा अभ्यास करायचा ठरवला. यासाठी त्यांनी वर्षभर अखंड राज्यभरात प्रसिद्ध असणाऱ्या तब्बल 45 प्रकारच्या मिसळीवर अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी पैशांची जुळवाजुळव करून साधारण तीन ते साडेतीन लाख रुपयांमध्ये आपल्या व्यवसायाची सुरुवात किनी टोल नाका परिसरात सुरू केली. जेमतेम दोनशे ते अडीचशे स्क्वेअर फूटमध्ये सुरू झाली. आणि ही मिसळ अगदी कमी वेळातच लोकप्रिय झाली.
ओल्या मसाल्याचा वापर होणारी एकमेव मिसळ
दत्त मिसळ सुरू करण्यापूर्वी आकाश आणि शिवमने वेगवेगळ्या पद्धतीच्या 45 प्रकारच्या मिसळींवर अभ्यास केला होता. त्यानुसार त्यांच्या चवीचे निरीक्षण केल्यानंतर सुक्या मसाल्याचा वापर करून मिसळ केली जात होती. त्यामुळे चवीमध्ये फरक पडत होता. हे लक्षात ठेवून या दोघा मित्रांनी पहिल्यांदाच ओल्या मसाल्याचा वापर मिसळीमध्ये करायचा निर्णय घेतला. आज दत्त मिसळ अखंड राज्यात पहिलीच मिसळ आहे जी ओल्या मसाल्याचा वापर करून केली जाते. आज या मिसळीला पुणे, सोलापूर, कोल्हापूर, इस्लामपूर, सांगली, वारणा, कोडोली या ठिकाणी सुरू आहेत आणि या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्वच्छतेची घेतली जाते काळजी
दत्त मिसळच्या आतापर्यंत साधारण अकरा फ्रेंचायजी लोकांच्या सेवेत आहेत. पण वाढता प्रतिसाद आणि होणारी गर्दी यामुळे त्याच्या स्वच्छतेकडे किंवा अन्नाच्या क्वालिटीकडे त्यांनी कधी दुर्लक्ष होऊ देत नाही. हे दोघे मित्र स्वतः या 11 ठिकाणी दर आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून या ठिकाणी भेट देतात. आणि त्यांच्या स्वच्छतेकडे आणि खाण्याच्या क्वालिटीकडे लक्ष देतात. त्यासोबतच ज्यांना ते फ्रेंचायजी देणार आहेत त्यांना 15 ते 20 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच स्वच्छता, क्वालिटी आणि हायजिन याचे ते महत्त्व पटवून देतात.
दत्तच्या स्पेशल डिशेस
आकाश आणि शिवम या दोघा मित्रांनी सुरू केलेली ही दत्त मिसळ त्यांच्या युनिक मिसळमुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करून मिसळचे वेगवेगळ्या प्रकारचे डिश लोकांच्या सेवेत आहेत. जसे की मटका दम मिसळ, पनीर मिसळ, मिसळ थाळी, चीज मिसळ, दत्त स्पेशल मिसळ अशा वेगवेगळ्या मिसळी दत्त मिसळने खवय्यांच्या सेवेत रुजू केल्या. दत्त मिसळची शाखा पुणे, सोलापूर, वारणा, कोडोली, इस्लामपूर, सांगली आणि कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. सुरुवातीला किनी टोल नाका परिसरात सुरू झालेल्या या मिसळीचा 80 ते 100 प्लेटचा खप व्हायचा. पण आत्ताच्या घडीला हा खप साधारण 3 ते साडेतीन हजारांपर्यंत गेलाय.