तुमच्या खात्यावर पैसे आले नाहीत तर समजून जा की तुमचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे, याबाबतची तक्रार तुम्ही ग्रामपंचायतीत करू शकता. या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या स्थानिक पातळीवरील पथकांकडून अर्जदार महिलांच्या नोंदींची तपासणी केली जात आहे.
advertisement
जिल्हा परिषदेच्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21,29 लाभार्थी आहेत. मात्र, 22,408 अर्ज प्रशासनाच्या नजरेत आले असून यातील अनेक प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, काही अर्जांमध्ये एका बंधूच्या पत्नी, विवाहित बहिणी आणि बहीण असे एकत्र भरल्याचंही प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता ही पडताळणी सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यांतील 50 हजारहून अधिक लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल 50,476 महिलांची नावे अपात्र ठरवून रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक महिला चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेत असल्याचे आढळून आलं. जिल्ह्यात एकूण 1,08,886 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील जवळपास निम्म्या अर्जदारांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
प्रशासनाने नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची सखोल चौकशी सुरू केली आहे. पोलिस विभाग व ग्रामस्तरावरील यंत्रणांमार्फत या सर्व अर्जांची छाननी केली जात असून, लाभ चुकीने घेतल्याचे आढळल्यास संबंधित महिलांचे अर्ज रद्द करण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली.