या पॉलिसीचं नाव धनवृद्धी योजना आहे. ही 23 जून 2023 रोजी लाँच करण्यात आली होती, मग सप्टेंबरमध्ये बंद करण्यात आली. या वर्षी फेब्रुवारीत ती पुन्हा सुरू करून 1 एप्रिल रोजी बंद करण्यात आली. ही योजना ठराविक मुदतीआधी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सुरक्षा पुरवायची.
या योजनेअंतर्गत विमा रक्कम किती
ही योजना कुटुंबांना कठीण काळात आर्थिक मदत मिळेल याची खात्री देते, ज्यामुळे भविष्य सुरक्षित होतं व स्थिरता येते. एलआयसीची ही योजना 10, 15 किंवा 18 वर्षांच्या कालावधीसाठी ऑफर केली होती. निवडलेल्या कालावधीनुसार, या योजनेतील गुंतवणुकीचे वय 90 दिवसांवरून 8 वर्षे ठेवण्यात आले होते. तर प्रवेशाचे कमाल वय 32 ते 60 वर्षे होते. या योजनेअंतर्गत, मूळ विम्याची रक्कम 1.25 लाख रुपये होती, जी 5000 च्या पटीत वाढवण्याचा पर्याय देण्यात आला होता.
advertisement
धनवृद्धी योजनेचे फायदे
- ही एक सिंगल प्रीमिअम योजना आहे.
- पॉलिसी कार्यकाळ व मृत्यू कव्हर
- पॉलिसी काळात अतिरिक्त लाभाची गॅरंटी
-उच्च मूळ विमा रकमेसह पॉलिसींसाठी उच्च गॅरंटीचा अतिरिक्त लाभ
-मृत्यू किंवा परिपक्वतेवर एकरकमी लाभ
- हप्त्यांमध्ये मृत्यू लाभ मिळविण्यासाठी आणि मॅच्युरिटीवर सेटलमेंट ऑप्शन
-एलआयसीचा अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ रायडर आणि एलआयसीचा नवीन टर्म ॲश्युरन्स रायडर निवडण्याचा ऑप्शन
- पॉलिसी लोन देणं
पॉलिसी सरेंडर करण्याचे नियम
एलआयसी पॉलिसी दस्तऐवजानुसार, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कधीही पॉलिसीधारक पॉलिसी सरेंडर करू शकतो. पॉलिसी सरेंडर केल्यावर, कॉर्पोरेशन गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू आणि स्पेशल सरेंडर व्हॅल्यू यापैकी जे जास्त असेल त्याच्या इतकी सरेंडर व्हॅल्यू दिली जाईल. पहिल्या तीन वर्षांत पॉलिसी सरेंडर केल्यास, सिंगल प्रीमिअमच्या 75 टक्के रक्कम दिली जाईल. यानंतर सरेंडरवर 90 टक्के प्रीमिअम दिला जाईल. यात अतिरिक्त आणि रायडर प्रीमिअमचा समावेश केला जाणार नाही.