महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे. महिला हळू हळू घरात थोडे पैसे वाचवून आणि LIC च्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून मोठा पैसा जमा करू शकतात. 8 ते 55 वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही दररोज २९ रुपये जमा करायचे आहेत. तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळू शकतात.
advertisement
प्लॅनवर मिळणार मोठा रिटर्न
तुम्ही 20 वर्षे दर महिन्याला 899 रुपये (दिवसाला 29 रुपये) जमा केले तर पहिल्या वर्षी तुम्ही फक्त 10,959 रुपये जमा कराल. जर तुम्ही 20 वर्षांसाठी जमा केले तर 20 वर्षांत एकूण 2 लाख 14 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. ज्यामध्ये तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून महिला आपलं भविष्य सुरक्षित करू शकतात आणि 20 वर्षांनंतर मोठी त्यांना मिळेल.
LIC ची जबरदस्त स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा पेन्शन!
पण ही अट पाळणं गरजेचं
LIC ची आधारशिला योजना सुरक्षा आणि बचत दोन्ही देते. ज्यांचे आधार कार्ड बनले आहे, अशा महिलाच याचा लाभ घेता येईल. एलआयसीची ही योजना पॉलिसीधारक आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला पैसे मिळतात.
तुम्हाला किमान १० तर कमाल २० वर्षासाठी गुंतवणूक केली तर फायदा जास्त मिळतो. यामध्ये ३ लाख रुपयांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकता. ७० वर्षांपर्यंत तुम्ही ही स्कीम एक्स्टेंड करू शकता. प्रीमियमचे पैसे तुम्ही महिना, तिमाही किंवा सहा महिन्यांनी भरू शकता.