TRENDING:

LIC Scheme: एकदाच भरा पैसे आणि आयुष्यभर मिळवा 12 हजार पेन्शन

Last Updated:

खासगी किंवा किंवा सरकारी नोकरीवर असलेली व्यक्ती पीएफ फंडातून मिळालेली रक्कम आणि ग्रॅच्युइटीची रक्कम निवृत्तीपूर्वी या योजनेत गुंतवत असेल आयुष्यभर दर महिन्याला पेन्शन मिळत राहील.

advertisement
मुंबई : नोकरी करणारे आपल्या उत्पन्नातून ठराविक रक्कम बचत करत असतात. नोकरदार रिटायरमेंटनंतर उत्पन्न मिळत राहावे, यासाठी गुंतवणूक करतात. रिटायरमेंटसाठी अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही सुरक्षित पर्याय शोधत असाल तर एलआयसीची एक योजना आहे. या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून महिन्याला पेन्शन मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला लोन घेण्याची सुविधा आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की वयाची 40 वर्षे पूर्ण असतील तरच तुम्हाला यात गुंतवणूक करता येते.
News18
News18
advertisement

खासगी किंवा किंवा सरकारी नोकरीवर असलेली व्यक्ती पीएफ फंडातून मिळालेली रक्कम आणि ग्रॅच्युइटीची रक्कम निवृत्तीपूर्वी या योजनेत गुंतवत असेल आयुष्यभर दर महिन्याला पेन्शन मिळत राहील. या योजनेचे नाव एलआयसी सरल पेन्शन योजना आहे. ही योजना रिटायरमेंटनंतर दर महिन्याला पेन्शनची हमी देते. तुम्हाला या फक्त एक वेळा गुंतवणूक करावी लागते, त्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळते. एलआयसी सरल पेन्शन योजना रिटायरमेंट योजना म्हणून खूप लोकप्रिय आहे. ही योजना तुम्हाला रिटायरमेंटनंतर दर महिन्याला 12 हजार रुपये पेन्शन देते.

advertisement

योजनेत गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा

या योजनेत 40 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकत नाही. कमाल वयोमर्यादा 80 वर्ष आहे. या पॉलिसी अंतर्गत, महिन्याला 1000 रुपयांची ॲन्युइटी घ्यावी लागते. तर तिमाहीसाठी तीन हजार, सहामाही सहा हजार आणि वार्षिक 12 हजारांची ॲन्युइटी घ्यावी लागते.

12000 रुपयांची पेन्शन कशी मिळेल?

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत तुम्ही किमान 12 हजार रुपयांची वार्षिक ॲन्युइटी खरेदी करू शकता. या योजनेत कमाल गुंतवणुकीला मर्यादा नाही. या पॉलिसी योजनेअंतर्गत, कोणीही एकदा प्रीमिअम भरून वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक पेन्शन मिळवू शकतं. एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, जर 42 वर्षांच्या व्यक्तीने 30 लाख रुपयांची ॲन्युइटी घेतली तर महिन्याला 12,388 रुपये पेन्शन मिळेल.

advertisement

लोन घेण्याची सुविधा

तुम्ही www.licindia.in या वेबसाईटवर जाऊन एलआयसीचा हा प्लॅन खरेदी करू शकता. ही पॉलिसी घेतल्यावर सहा महिने पूर्ण झाल्यारवर तुम्ही सरेंडर करू शकता किंवा लोन घेऊ शकता. लोन किती मिळेल ते गुंतवणुकीच्या रकमेवर अवलंबून असते.

मराठी बातम्या/मनी/
LIC Scheme: एकदाच भरा पैसे आणि आयुष्यभर मिळवा 12 हजार पेन्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल