ही स्किम एलआयसी सरल पेन्शन योजना आहे. जी निवृत्तीनंतर दरमहा पेन्शनची हमी देते. त्याची खास गोष्ट म्हणजे, तुम्ही यामध्ये एकदाच गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. LIC सरल पेन्शन योजना ही सेवानिवृत्ती योजना म्हणून खूप प्रसिद्ध आहे. या योजनेमुळे तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळू शकते. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला 12000 रुपये पेन्शनचा लाभ कसा मिळेल हे काही सोप्या मार्गांनी समजू शकते.
advertisement
एखादी व्यक्ती खाजगी क्षेत्रात किंवा सरकारी विभागात काम करत असेल आणि त्याच्या पीएफ फंडातून मिळालेली रक्कम आणि ग्रॅच्युइटीची रक्कम निवृत्तीपूर्वी गुंतवली तर त्याला आयुष्यभर दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळत राहील.
LIC सरल पेन्शन योजनेचे फीचर
एलआयसीच्या या योजनेबद्दल सांगायचे तर, 40 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही त्यात 80 वर्षापर्यंत कधीही गुंतवणूक करू शकता आणि या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला मासिक 1000 रुपयांची वार्षिकी खरेदी करावी लागेल. तर त्रैमासिक अंतर्गत किमान 3000 रुपये, तसहामाहीच्या आधारे 6000 रुपये आणि वार्षिक आधारावर 12000 रुपयांची अॅन्युटी घेणे आवश्यक आहे.
12000 रुपये पेन्शन कसे मिळेल?
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत तुम्ही वार्षिक किमान 12 हजार रुपयांची वार्षिकी खरेदी करू शकता. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणुकीची लिमिट नाही. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करता येईल. या पॉलिसी योजनेअंतर्गत, कोणताही नागरिक एकदा प्रीमियम भरून वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, जर 42 वर्षांच्या कोणत्याही व्यक्तीने 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी केली तर त्याला दरमहा 12,388 रुपये पेन्शन मिळेल.
कर्जही घेऊ शकतो
एलआयसीचा हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला www.licindia.in ला भेट द्यावी लागेल. जर या पॉलिसी अंतर्गत 6 महिने पूर्ण झाले असतील, तर तुम्ही गरज पडल्यास ते सरेंडर करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जही घेऊ शकता. मात्र, कर्जाची रक्कम तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असेल.