आपण एलआयसीच्या काही मौल्यवान संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील जीवन भारती बिल्डिंग, कोलकाता येथील चित्तरंजन अव्हेन्यू येथील एलआयसी बिल्डिंग आणि मुंबईतील एशियाटिक सोसायटी आणि अकबर रॅलीतील एका हाउसिंग प्रॉपर्टीचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, अंतिम व्हॅल्युएशनदरम्यान, या मालमत्तेची एकूण किंमत 50-60 हजार कोटी रुपयांदरम्यान आहे, असं म्हटलं जात आहे. यासोबतच एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा इन्शुरन्स प्रदाता आणि स्टॉक मार्केटमधील सर्वाधिक गुंतवणूक करणारी कंपनी आहे.
advertisement
एलआयसीच्या संपत्तीचं मूल्यांकन केलं जाणार
सार्वजनिक क्षेत्रातील या विमा कंपनीकडे 51 ट्रिलियन रुपयांची मालमत्ता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्री प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कंपनी आपल्या मालमत्तेचं मूल्यांकन सुरू करू शकते. एलआयसीने त्यांच्या अनेक मालमत्तांचं मूल्यांकन अजून केलेलं नाही आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे की या मालमत्तेचं मूल्य त्यांच्या वास्तविक किमतीपेक्षा पाचपट जास्त असेल. म्हणजेच हा आकडा अडीच ते तीन ट्रिलियन रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.
एलआयसीचा नफा गेला 40 हजार कोटींच्या पार
2023-24 या आर्थिक वर्षात एलआयसीचा नफा 40,676 कोटी रुपये होता. सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी भारतात जमिनीच्या मालकीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत भारतीय रेल्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे. एलआयसी आपल्या मालमत्तेचे व्यवस्थापन आणि विक्रीसाठी एक नवीन संस्था तयार करू शकते, अशी देखील माहिती आहे.