TRENDING:

बारावी उत्तीर्णांसाठी राज्य सरकार देणार 6000 रुपये, काय आहे योजना?

Last Updated:

राज्यातील बारावी उत्तीर्णांसाठी महत्त्वाची योजना लागू केली आहे. या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे.

advertisement
मुंबई : राज्य सरकारने महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आणल्यानंतर आता राज्यातील बारावी उत्तीर्णांसाठी महत्त्वाची योजना लागू केली आहे. या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेसाठी 5500 कोटींची तरतूद केली आहे. 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' या योजनेतंर्गत सरकार विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार आहे.
खरंतर भारतीय रिजर्व बँकेने या लहान नोटींची छपाई बंद केली आहे. हा मुद्दा उचलत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना टागोर यांनी पत्र लिहिले की बाजारात या नोटांची कमी आहे, ज्यामुळे गरीब आणि सर्व सामान्य जनतेला त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
खरंतर भारतीय रिजर्व बँकेने या लहान नोटींची छपाई बंद केली आहे. हा मुद्दा उचलत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना टागोर यांनी पत्र लिहिले की बाजारात या नोटांची कमी आहे, ज्यामुळे गरीब आणि सर्व सामान्य जनतेला त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
advertisement

मागील काही महिन्यांमध्ये राज्य सरकारने समाजातील विविध घटकांसाठी योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील गरजू महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तर, दुसरीकडे आता राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. राज्यातील उद्योग-व्यवसाय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना राज्यातील उद्योग क्षेत्रात सहा महिने काम करण्याचा अनुभव मिळणार आहे.

advertisement

विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प,उद्योग, स्टार्टअप्स, विविध कंपन्या यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. त्यानुसार ही विद्यार्थ्यांना या योजनेनुसार संधी मिळणार आहे.

या योजनेसाठी उमेदवारांचे पात्रता निकष काय?

- उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे.

- उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास/आयटीआय/पदववका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.

- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.

advertisement

- उमेदवाराची आधार नोंदणी असावी.

- उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.

- उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

कोणत्या विद्यार्थ्याला किती विद्यावेतन मिळणार?

- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला दरमहा 6 हजार रुपयांचे विद्यावेतन

- आयटीआय/ डिप्लोमा विद्यार्थ्याला दरमहा 8 हजार रुपयांचे विद्यावेतन

- पदवीधर/पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचे विद्यावेतन

advertisement

या योजनेची वैशिष्ट्ये काय?

उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणााद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार, सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेतंर्गत प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असणार आहे. या कालावधीत राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येणार आहे. हे विद्यावेतन लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये थेट जमा होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
बारावी उत्तीर्णांसाठी राज्य सरकार देणार 6000 रुपये, काय आहे योजना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल