धाराशिव - कुठलाही व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो. व्यक्तीने जर जिद्दीने न खचता सातत्य ठेवले तर एक दिवस तो व्यक्ती नक्की यशस्वी होतो, हेच एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. पंक्चर आणि वेल्डिंगच्या व्यवसायापासून सुरुवात केली आणि आज दिवसासाठी 5 ते 10 हजारांची उलाढाल करत आहेत. जाणून घेऊयात, ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
भास्कर शिकेतोड असे या व्यक्तीचे नाव आहे. ते धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अंतरवाली येथील रहिवासी आहेत. त्यांनी 1999 मध्ये भूम शिर्डी रस्त्यावर टायर पंक्चरचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी 15 दिवसात एकही रुपयाचे उत्पन्न मिळाले नाही. मात्र, न खचता त्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला. आता सिझनमध्ये दिवसाकाठी ते 5 ते 10 हजार रुपयांची उलाढाल करतात.
सुरुवातीला 15 दिवसात एकही रुपया त्यांना त्यातून मिळाला नाही त्यानंतर त्यांनी टायर पंक्चरच्या जोडीला वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू व्यवसाय वाढत गेला. आता त्यांच्याकडे श्रीकांत टायर्स, आकाश मशनरी आणि हार्डवेअर, याच्यासह कोळपी बनवण्याचाही ते व्यवसाय करत आहेत.
शिक्षण BCS, पण निवडली शेती, एक एकर ड्रॅगन फ्रुटमधून 6 लाखांची कमाई, धाराशिवच्या तरुणाची कमाल!
आता त्यांना सिजनमध्ये दिवसाकाठी 5 ते 10 हजार रुपयांची उलाढाल होत आहे. अपयश आल्यानंतरही त्यांनी जिद्दीच्या जोरावर आपला व्यवसाय वाढवला. दोन्ही मुलांच्या साथीने आता ते आपला व्यवसाय चालवत आहेत. तसेच आता याच व्यवसायाची चांगली भरभराट झाली आहे आणि त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे. कोणत्याही व्यवसायात जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवल्यास तो व्यवसाय आपल्याला भरभरून यश मिळवून देतो, त्यांच्या या उदाहरणावरुन ही बाब सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.