या कपातीचा फटका इंजिनिअरिंग आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या महत्त्वाच्या विभागांना बसला आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया अत्यंत अचानक आणि धक्कादायक पद्धतीने करण्यात आली. कोणतीही पूर्वसूचना, बैठक किंवा चर्चा न करता कर्मचाऱ्यांचे कंपनी सिस्टिमवरील अॅक्सेस बंद करण्यात आले आणि फक्त एका ईमेलद्वारे त्यांची सेवा समाप्त करण्यात आली.
ओरॅकलकडून सेवरन्स पॅकेजबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली तरी प्रभावित कर्मचारी सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करत आहेत. विशेषतः Reddit r/employeesofOracle या फोरमवर याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
advertisement
एका Reddit युजर u/Lavishness897 ने बेंगळुरूतील ओरॅकलच्या IDC विभागातील सेवरन्स स्ट्रक्चरबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना बेस सॅलरीच्या 15 दिवसांचा मोबदला तसेच न वापरलेल्या सुट्ट्यांचे पैसे देण्यात येत आहेत.
याशिवाय कंपनीकडून 2 महिन्यांचे एक्स-ग्रेशिया पेमेंट आणि प्रत्येक सेवावर्षासाठी अतिरिक्त 15 दिवसांचा मोबदला दिला जात आहे. तसेच 1 महिन्याचा गार्डनिंग लीव्ह पगार किंवा त्याऐवजी समतुल्य रक्कम आणि विम्यासाठी 20,000 देण्यात येत असल्याचे सांगितले जाते.
त्या युजरने लिहिले आहे: वर्षाला 15 दिवस + वार्षिक रजा + (सदिच्छा अनुदान - वर्षाला अतिरिक्त 15 दिवस + 2 महिने) + 1 महिना 'गार्डन लीव्ह' (रजेचा कालावधी) किंवा त्याऐवजी वेतन + विम्यासाठी 20,000. टीप: ही माहिती IDC DB Org, बेंगळूरु यांच्यासाठी लागू आहे.
Is the severance worse for IDC folks ? 15 days/year of service + 2monthsadvertisementby
जर ही माहिती अचूक असेल तर सेवरन्स पॅकेजमध्ये निश्चित वेतन, सेवाकालानुसार अतिरिक्त रक्कम, सुट्ट्यांचे एन्कॅशमेंट आणि इतर भत्ते यांचा समावेश आहे. काही कर्मचाऱ्यांच्या अंदाजानुसार एकूण पॅकेज सुमारे 3 महिने आणि 15 दिवसांच्या पगाराएवढे असू शकते. याशिवाय सेवाकालावर आधारित अतिरिक्त लाभही मिळू शकतात. मात्र प्रत्यक्ष रक्कम पद, अनुभव आणि विभागानुसार बदलू शकते.
कर्मचाऱ्यांच्या चर्चेत आणखी एक मुद्दा पुढे आला आहे. तो म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांसाठी सेवरन्स पॅकेज समान नसू शकते. वेगवेगळ्या पदांनुसार आणि विभागांनुसार पॅकेजमध्ये फरक असू शकतो. ओरॅकलकडून भारतासाठी अधिकृत तपशील अद्याप जाहीर केलेला नाही.
तसेच हे पॅकेज स्वेच्छेने आणि परस्पर सहमतीने राजीनामा देण्याशी जोडलेले असू शकते अशीही चर्चा आहे. म्हणजेच कर्मचारी जर या अटी मान्य करत असतील तर त्यांना पूर्ण लाभ मिळू शकतो; अन्यथा कमी किंवा वेगळे मोबदले मिळण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारची पद्धत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करताना वापरली जाते. ज्यामुळे प्रक्रिया जलद होते आणि वाद टाळता येतात. मात्र भारतातील या अटींबाबत ओरॅकलकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान अमेरिकेतील सेवरन्स पॅकेजशी याची तुलना केली जात आहे. Business Insider च्या अहवालानुसार अमेरिकेत ओरॅकलच्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 26 आठवड्यांचे सेवरन्स देत आहे. यात 4 आठवड्यांचा बेस पगार आणि प्रत्येक सेवावर्षासाठी 1 आठवड्याचा अतिरिक्त मोबदला दिला जातो.जो 26 आठवड्यांपर्यंत मर्यादित आहे. म्हणजेच सुरुवातीला 4 आठवड्यांचा पगार आणि त्यानंतर सेवाकालानुसार अतिरिक्त आठवड्यांचे पेमेंट दिले जाते. भारत आणि अमेरिकेतील या फरकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
Disclaimer : ही माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या यूजर-जनरेटेड कंटेंटवर आधारित आहे. आम्ही अधिकृतरीत्या याची पडताळणी झालेली नाही आणि याला अंतिम सत्य मानू नये.
