TRENDING:

कॅशबॅक पडलं महागात! मोबाइल ॲपद्वारे लूट; तुमची तर होत नाहीये ना फसवणूक?

Last Updated:

कॅशबॅकच्या नावाखाली युजर्सना काही महिन्यांत चांगला परतावा मिळेल अशी ऑफर दिली जात होती. हा पाच हजार कोटींचा घोटाळा आहे, असा आरोप फसवणूक झालेल्या लोकांनी केला आहे.

advertisement
नवी दिल्ली : प्रत्येक रिचार्ज आणि खरेदीवर आजकाल अनेक पेमेंट अग्रीगेटर ॲप्स कॅशबॅक ऑफर करतात. पण, या कॅशबॅकच्या नावाखाली गुरुग्राम येथील एका कंपनीने मोठा घोटाळा केला आहे. टॉकचार्ज नावाच्या कंपनीने लोकांची पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सीएनए-न्यूज 18 च्या एका एक्सक्लुसिव्ह रिपोर्टमध्ये टॉकचार्ज नावाच्या कंपनीच्या विरोधात केलेल्या तपासणीत धक्कादायक गोष्टी आढळल्या. कॅशबॅकच्या नावाखाली युजर्सना काही महिन्यांत चांगला परतावा मिळेल अशी ऑफर दिली जात होती. हा पाच हजार कोटींचा घोटाळा आहे, असा आरोप फसवणूक झालेल्या लोकांनी केला आहे. या कंपनीने एप्रिल 2024 मध्ये ऑपरेशन बंद केले होते. सीएनएन-न्यूज 18 ने गुरुग्राममध्ये अंकुश कटियार यांनी स्थापन केलेल्या टॉकचार्जच्या पाँझी स्किममधील पीडितांशी संवाद साधला.
कॅशबॅकच्या नावाने लूट
कॅशबॅकच्या नावाने लूट
advertisement

गुंतवणूक कैकपटीने वाढवण्याचे वचन देणाऱ्या ॲपने देशभरात कोट्यवधी लोकांची फसवणूक केली आहे. या ॲपला रेटिंग खूप कमी होतं आणि तरीही हे ॲप जवळपास दोन मिलियन लोकांनी डाउनलोड केले, असा दावा करण्यात आला आहे. देशभरात या ॲपच्या प्रमोटर्सविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत.

इथं स्वस्तात आहे नवा iPhone 16; तब्बल 1,19,900 रुपयांचा फोन काही हजारांत मिळतोय

advertisement

पीडितांनी सांगितले अनुभव

या घोटाळ्यातील एक पीडित राजस्थानच्या दौसा येथील राम अवतार शर्मा आहेत. ते म्हणाले की त्यांनी कधीच विचार केला नव्हता की त्यांची मेहनतीची कमाई आणि सगळी सेव्हिंग्ज अशाप्रकारे कोणीतरी लुटेल. त्या ॲपमधून फक्त नफा मिळेल या हेतूने गुंतवणूक केली होती, तोटा होईल असं वाटलं नव्हतं. “ॲपमध्ये पैसे गुंतवण्यासाठी मी बँकांकडून कर्जही घेतलं होतं, आता आत्महत्येशिवाय माझ्यासमोर पर्याय उरलेला नाही,” असं ते म्हणाले.

advertisement

मोठमोठ्या कॅशबॅकच्या ऑफर

सुरुवातीला प्रीपेड पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून टॉकचार्ज लाँच करण्यात आले, त्यानंतर युजर्सना आकर्षक कॅशबॅकच्या ऑफर देण्यात आल्या. त्यामुळे अनेक लोक त्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित झाले. ऑफरमध्ये फक्त 4,999 च्या डिपॉझिटवर 1,666 रुपयांचा कॅशबॅक, तर बँक खात्यात 7,50,000 रुपयांचा मोठा कॅशबॅ मिळवण्यासाठी फक्त 59,999 टॉकचार्ज वॉलेटमध्ये जमा करावे लागतील, अशा ऑफर्सचा समावेश होता. टॉकचार्जवर विश्वास ठेवणं ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असं आता पीडित म्हणत आहेत.

advertisement

2017 मध्ये ग्राहकांसाठी अनेक ई-वॉलेट ऑप्शन उपलब्ध होते आणि टॉकचार्जने बाजार स्टँडर्डपेक्षा जास्त कॅशबॅक ऑफर केले होते. एकदा युजर्सचा विश्वास जिंकल्यावर कंपनीने बिग मनी ऑफर दिल्या आणि मग लोक यात जास्त पैसे गुंतवू लागले.

विश्वास जिंकून फसवणूक

जुलै 2023 मध्ये, कंपनीने 20 टक्के सुविधा शुल्क आकारायला सुरुवात केली, जी चुकीची होती. ऑगस्ट 2023 मध्ये, कंपनीने 20 टक्के सुविधा शुल्कपासून सुटका करण्यासाठी आणि विड्रॉल सोपे करण्यासाठी 1,49,999 च्या टॅगसह एक प्रोमो कोड ‘नो फी’ लाँच केला. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये फसवणूक करणारे व्यवहार सुरू झाले.

advertisement

ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेंडरला केलेलं पेमेंट यशस्वी झाले पण बिलरला पैसे मिळाले नाहीत. मार्च 2024 मध्ये ॲप्लिकेशनवरील पैसे विड्रॉल करणे आणि इतर सेवा पूर्णपणे बंद झाल्या. पीडित रामावतार शर्मा म्हणाले, “माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचे एकूण वॉलेट बॅलेन्स 1.19 कोटी रुपये आहे. हे पैसे मला परत न मिळाल्यास अनेक अडचणींचा सामना मला करावा लागेल.“ कॅशबॅकच्या नावाखाली या ॲपद्वारे अनेकांची फसवणूक करण्यात आली. सीएनएन-न्यूज 18 च्या तपासणीत या ॲपमध्ये देशभरातील 800 लोकांनी पैसे गमावले आहेत.

iPhone 16 लाँच होताच युजर्सना धक्का, आयफोनचे 3 मॉडेल केले बंद

आणखी एक पीडित अभिषेक मणी म्हणाला, “या घोटाळ्याचे मास्टर माइंड युजर्सची फसवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करत होते. या ॲपची को फाउंडर शिवानी माहेश्वरीला अनेक नवीन स्टार्टअप्सची कॅपिटलिस्ट आहे, असं म्हटलं गेलं. जर तुम्ही तिचं बॅकग्राउंड वाचलं तर तुम्हाला कळेल की तिने टॉकचार्जपूर्वी कधीच कोणत्याही कंपनीत काम केलं नाही, तर ती कोणत्या आधारावर स्टार्टअपमध्ये करोडोंची गुंतवणूक करू शकली."

कंपनीविरोधात अनेक तक्रारी

संपूर्ण देशभरात टॉकचार्जच्या प्रमोटर्सविरुद्ध अनेक तक्रारी आणि एफआयआर दाखल झाले आहेत. सीएनएन- न्यूज 18 ला गुरुग्राम पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केलेल्या एफआयआरबद्दल माहिती मिळवण्यात यश आले आहे. या एफआयआरनुसार फक्त अंकुश कटियारच नाही तर को फाउंडर शिवानी माहेश्वरी आणि टॉकचार्जच्या काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. आरबीआय, सेबी, आयकर आणि जीएसटी विभागांकडे अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, पण अजून यापैकी कोणत्याही प्राधिकरणाकडून उत्तर मिळालेलं नाही.

मराठी बातम्या/मनी/
कॅशबॅक पडलं महागात! मोबाइल ॲपद्वारे लूट; तुमची तर होत नाहीये ना फसवणूक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल