iPhone 16 लाँच होताच युजर्सना धक्का, आयफोनचे 3 मॉडेल केले बंद

Last Updated:

फोन लाँचिंगच्या कार्यक्रमात कंपनीने युजर्सना आणखी एक धक्का दिला आहे. कंपनीने आपली तीन जुनी मॉडेल्स बंद करण्याची घोषणा केली आहे.

News18
News18
दिल्ली : अ‍ॅपलचे फोन दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये लाँच होतात. या परंपरेनुसार यावर्षी आयफोन 16 सीरिज 9 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आली. कंपनीने 'अ‍ॅपल ग्लोटाइम इव्हेंट 2024' या कार्यक्रमात आयफोन 16 सीरिज जागतिक स्तरावर लाँच केली. नवीन आयफोन 16 सीरिजमधील बेस मॉडेल 79 हजार 900 रुपयांना उपलब्ध असेल. यावेळी अ‍ॅपलने आपल्या फोनमध्ये अ‍ॅपल इंटिलिजन्स म्हणजेच एआयचा वापर केला आहे. याशिवाय नवीन मॉडेलमध्ये इतरही अनेक मोठे अपग्रेड्स पाहायला मिळतील. फोन लाँचिंगच्या कार्यक्रमात कंपनीने युजर्सना आणखी एक धक्का दिला आहे. कंपनीने आपली तीन जुनी मॉडेल्स बंद करण्याची घोषणा केली आहे.
अ‍ॅपलने या वर्षी लाँच केलेल्या आयफोन 16 सीरीजमध्ये चार मॉडेल्स लाँच केली आहेत. त्यामध्ये आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. सीरिजमधील सर्वात बेसिक फोनची किंमत 79 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. आयफोन 16 प्रो मॅक्स हे या सीरिजमधील टॉप व्हेरियंट मॉडेल आहे. त्याची किंमत 1 लाख 84 हजार 900 रुपये आहे. नवीन आयफोन सीरिजमध्ये कंपनीने एआय फीचर्ससह कॅमेरामध्ये मोठे अपग्रेड केले आहेत. या सीरिजमधील सर्व मॉडेल्स डेडिकेटेड कॅप्चर बटणासह मिळत आहेत. याशिवाय, आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसच्या डिझाइनमध्येही काही बदल करण्यात आले आहेत.
advertisement
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील कंपनीने नवीन फोनच्या लाँचनंतर जुनी मॉडेल्स बंद करण्याची घोषणा केली आहे. गेल्यावर्षी आयफोन 15 सीरीज लाँच केल्यानंतर कंपनीने अ‍ॅपल स्टोअरमधून आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स काढून टाकले होते. आयफोन 14 लाँच झाल्यानंतर त्याच्या प्रो आणि मिनी मॉडेल्सची विक्री थांबवण्यात आली होती. या सीरिजमधील फक्त बेस मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होती. तीही आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
आयफोन16 सीरिज लाँच होताच कंपनीने आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्सचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, कंपनीने 2021 मध्ये लाँच केलेल्या आयफोन 13 ची विक्री थांबवण्याचाही निर्णय घेतला आहे. आता हे तिन्ही आयफोन कंपनीच्या अधिकृत स्टोअरमध्ये विकले जाणार नाहीत. पण, स्टॉक संपेपर्यंत ही तीन मॉडेल्स ई-कॉमर्स वेबसाइट आणि इतर रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असतील.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
iPhone 16 लाँच होताच युजर्सना धक्का, आयफोनचे 3 मॉडेल केले बंद
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement